धामोडे ग्रामपंचायतीला लाभार्थींनी ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2019 10:28 PM2019-10-02T22:28:32+5:302019-10-02T22:31:44+5:30
येवला : तालुक्यातील धामोडे येथील ग्रामपंचायत कार्यालयाला घरकुलापासून वंचित असलेल्या लाभार्थींनी कुलूप लावले. लाभार्थींनी दोन महिन्यांपूर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सभापती यांना तक्र ार अर्ज दिला होता; मात्र त्याची दखल न घेतल्याने संतप्त लाभार्थींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : तालुक्यातील धामोडे येथील ग्रामपंचायत कार्यालयाला घरकुलापासून वंचित असलेल्या लाभार्थींनी कुलूप लावले.
लाभार्थींनी दोन महिन्यांपूर्वी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सभापती यांना तक्र ार अर्ज दिला होता; मात्र त्याची दखल न घेतल्याने संतप्त लाभार्थींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
पंतप्रधान घरकुल योजनेतील १५ घरकुले अपात्र करण्यात आले आहेत. संबंधित लाभार्थी आपलं हक्काचं घर मिळावे म्हणून कित्येक दिवसांपासून घरकुल मिळेल या आशेवर वाट बघत होते; मात्र ग्रामसेवकांनी सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता पंचायत समितीला ग्रामसभेचा ठराव परस्पर दिल्याने या लाभार्थींना अपात्र करण्यात आले.
लाभार्थींनी संबंधित ग्रामसेवकांना वेळोवेळी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे या लाभार्थींनी कुलूप लावण्याचा पवित्रा हाती घेतला आहे.घरकुल प्रकरण गाजल्यामुळे येवला तालुक्यातील इतर गावांतील लाभधारकांनीही या विषयात हात घातला आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला हक्काच्या घराचा प्रश्न सोडविण्यासाठी आता तालुक्यातूनही आंदोलनाचे हत्यार उपसले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभीमीवर धामोडे गाव परिसरातील लाभार्थींनी वंचित असलेल्या लाभार्थींची भेट घेत संयुक्त आंदोलन करण्याचे नियोजन केल्याचेही समजते.