खासगी रुग्णालयाकडून बाधितांवरील उपचारास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:26+5:302021-03-17T04:15:26+5:30

खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना दाखल करण्यात येत नाही. याबाबत मनपा आरोग्य अधिकारी ठाकरे यांच्याकडे चौकशी केली असता ...

Avoid treatment of the victim by a private hospital | खासगी रुग्णालयाकडून बाधितांवरील उपचारास टाळाटाळ

खासगी रुग्णालयाकडून बाधितांवरील उपचारास टाळाटाळ

googlenewsNext

खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना दाखल करण्यात येत नाही. याबाबत मनपा आरोग्य अधिकारी ठाकरे यांच्याकडे चौकशी केली असता काही रुग्णालयांनी आमच्याकडे तशी खास व्यवस्था नसल्याचे सांगून रुग्णांवर उपचार करू शकत नसल्याचे कळविले आहे. शासनाने त्यांना या योजनेअंतर्गत उपचार करण्याचे आदेश दिले असताना सदर रुग्णालये काही तरी कारण सांगून उपचार करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

या योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांना संबंधित रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक करण्यात यावे. त्यासाठी लागणारी यंत्रणा उभी करणे ही त्या-त्या रुग्णालयांची जबाबदारी आहे. महापालिका प्रशासनाने या विषयी त्वरित गंभीर दखल घेऊन सदर रुग्णालयांना उपचार करण्यासाठी आदेश पारित करावेत. जी रुग्णालये रुग्ण दाखल करण्यास टाळाटाळ करतील अशा रुग्णालयांची महात्मा फुले जन आरोग्य योजनेची मान्यता रद्द करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

फोटो - १६ मालेगाव संभाजी ब्रिगेड :

मालेगाव येथील मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांना निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील व पदाधिकारी.

===Photopath===

160321\16nsk_33_16032021_13.jpg

===Caption===

मालेगाव येथील मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे यांना निवेदन देतांना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील व पदाधिकारी.

Web Title: Avoid treatment of the victim by a private hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.