भविष्य निर्वाह निधी परतावा देण्यास टाळाटाळ ; बाजार समिती कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:13+5:302021-09-22T04:18:13+5:30

पंचवटी : लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्याने सभापती देविदास पिंगळे व इतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात ...

Avoidance of refund of provident funds; Market committee employee's self-immolation warning | भविष्य निर्वाह निधी परतावा देण्यास टाळाटाळ ; बाजार समिती कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

भविष्य निर्वाह निधी परतावा देण्यास टाळाटाळ ; बाजार समिती कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

Next

पंचवटी : लाखो रुपयांच्या अपहार प्रकरणी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाऱ्याने सभापती देविदास पिंगळे व इतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात साक्ष दिल्याने तत्काळ बदली करून भविष्य निर्वाह निधी खात्यामधील ना परतावा रक्कम देण्यास टाळाटाळ करत असल्याबाबत बदली आणि छळाविरोधात कर्मचारी ज्ञानेश्वर मांडे यांनी जिल्हा उपनिबंधक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार देणारे ज्ञानेश्वर मांडे हे बाजार समितीत निरीक्षक पदावर कार्यरत असून सेवानिवृत्तीचा कार्यकाळ दहा ते अकरा महिन्यांचा राहिला आहे. पाच वर्षांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सभापती पिंगळे विरोधात केलेल्या कारवाईमध्ये ते साक्षीदार असून साक्ष बदलावी यासाठी दबाब टाकला जात असल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. सप्टेंबर २०१६ साक्ष झाली असून त्यात घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला आहे. साक्ष सभापती पिंगळे, कर्मचारी अरविंद जैन, विजय निकम आणि दिगंबर चिखले यांच्या विरोधात असल्याने राग मनात धरून पिंगळे यांनी त्यांची बदली पेठ येथे केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे, पेठ बाजार समितीची कोणतीही मालमत्ता कार्यालय अस्तित्वात नाही. वर्षभरात एकाही कर्मचाऱ्याची नियुक्ती केली नसताना आपली अन्यायकारक बदली करून त्रास दिला जात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्याचप्रमाणे मुलाच्या लग्नासाठी माझ्या भविष्य निर्वाह निधी खात्यातून परतावा दोन लाख रुपये रक्कम मिळावी म्हणून अर्ज करूनही अर्ज मंजूर केला नसल्याचा उल्लेख करीत आपल्याला हेतुपुरस्कर त्रास दिला जात असून आपल्यावरील अन्याय थांबला नाही तर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा मांडे यांनी दिला आहे.

210921\21nsk_46_21092021_13.jpg

सीता सरोवर 

Web Title: Avoidance of refund of provident funds; Market committee employee's self-immolation warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.