वादळात तुटलेल्या विद्युत वाहिन्या दुरुस्तीची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:46 PM2020-06-07T17:46:43+5:302020-06-07T17:47:23+5:30
निसर्ग चक्रीवादळामुळे शहरातील अनेक ठिकाणी वीजेच खांब वाकले आहेत. तर काही ठिकाणी खांब पडून विद्युत ताराही तुटल्या आहेत. असाच प्रकार सिडकोतील राणा प्रताप चौकात उच्च विद्युत वाहिनीची तार तुटल्याने घडला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून परिसरातील नागरिकांना विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीची प्रतिक्षा लागली आहे.
नाशिक : शहरासह उपनगरांमध्येही अनेक ठिकाणी निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला असून विविध ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वीज तारांचे मोठ्या नुकसान झाल्याने शहरातील काही भागातील वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. परंत, सिडकोतील राणाप्रताप चौकासारख्या परिसरात अद्याप या विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसून परिसरातील नागरिकांना विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीची प्रतिक्षा लागली आहे.
निसर्ग चक्रीवादळामुळे शहरातील अनेक ठिकाणी वीजेच खांब वाकले आहेत. तर काही ठिकाणी खांब पडून विद्युत ताराही तुटल्या आहेत. असाच प्रकार सिडकोतील राणा प्रताप चौकात उच्च विद्युत वाहिनीची तार तुटल्याने घडला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिककमध्ये चक्रीवादळ ३ जूनला धडकल्यानंतर तब्बल पाच दिवस उलटूनही या विद्युत तारांच्या दुरु स्तीसंदर्भात कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांमध्ये आधीच कोरोनाची भीती होती, त्यात निसर्गचक्र ी वादळामुळे पाऊस व नुकसान यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच विजेच्या तारा तुटत असल्याने भीती वाढत आहे. पावसामुळे वीज प्रवाह थेट रस्त्यात उतरण्याची भीती निर्माण झाली असून सिडकोतील राणा प्रताप चौकात, जैन स्थानकाजवळ उच्चदाबाची वीज तार तुटली. रात्रीच्या वेळी ही तार तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. भर रस्त्यात तार पडल्याने अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. काही जागृत युवकांनी याबाबत रस्ता अडविल्याने अनर्थ टळला. मात्र अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी व मुख्य वीजप्रवाहाची वीज तार तुटल्याने ती तत्काळ दुरु स्त होणे अपेक्षित असताना वीज मंडळाच्या दिरंगाईबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.