वीस लाख क्विंटल कांदा विक्रीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:53+5:302021-05-24T04:13:53+5:30
गेले पंधरा दिवस लिलाव बंदने कांदा व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा परराज्यात विक्री केला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाच्या ...
गेले पंधरा दिवस लिलाव बंदने कांदा व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा परराज्यात विक्री केला आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाच्या खळ्यांवर फारसा कांदा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे व्यापारी वर्गाकडून परराज्यातील व्यापाऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी कांदा खरेदी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून लिलाव सुरू होऊन केवळ पाचशे वाहनांनाच प्रवेश दिला जाणार असल्याने मर्यादित स्वरुपात कांदा विक्रीस येणार आहे. त्यामुळे प्रथम क्रमांकाचे कांद्यास मागणी वाढून कांदा दरात तेजी येणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
इन्फो
अवकाळीमुळे शेतकऱ्यांची अडचण
कोरोनामुळे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद होत्या. अशातच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कांद्यासह शेतपिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाने दिलासा द्यावा, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, बंदनंतर कांद्याचे लिलाव सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांना बाजार समितीचे वेध लागले असून, सोमवारी बाजार समित्या पुन्हा एकदा गजबजणार आहेत.
फोटो- २३ लासलगाव मार्केट
===Photopath===
230521\23nsk_28_23052021_13.jpg
===Caption===
फोटो- २३ लासलगाव मार्केट