जागरूक नागरिकांनी वृक्षतोड रोखली

By admin | Published: November 29, 2015 10:53 PM2015-11-29T22:53:04+5:302015-11-29T22:57:28+5:30

जागरूक नागरिकांनी वृक्षतोड रोखली

Awakened citizens prevent tree trunks | जागरूक नागरिकांनी वृक्षतोड रोखली

जागरूक नागरिकांनी वृक्षतोड रोखली

Next

सिडको/पाथर्डी फाटा : विल्होळी येथील पॉवरडील कंपनीसमोर शुक्रवारी (दि़२७) सकाळी सुरू असलेली बेकायदा वृक्षतोड संतप्त ग्रामस्थांनी एकत्र येत बंद पाडली़ या घटनेनंतर ग्रामस्थांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले़
विल्होळी परिसरातील पॉवरडील कंपनीसमोर रस्त्याच्या कडेला सुमारे ६० ते ७० गुलमोहर, सिल्व्हर ओक आदि प्रकारचे वृक्ष आहेत़ या वृक्षांपैकी सुमारे १५ वृक्ष अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी सकाळी तोडली़ ही घटना विल्होळीचे सरपंच बाजीराव गायकवाड यांना समजताच त्यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी धाव घेऊन वृक्षतोड बंद केली़
यानंतर ग्रामस्थांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या घटनेची चौकशी करण्याचे, तर जीवन नागरी एवं पर्यावरण संस्थेने गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे़ या निवेदनावर मोहन भावनाथ, हिरामण थोरात,
दिनेश गायकवाड, राजू थोरात, यशवंत भावनाथ, अक्षय परदेशी, आबा पाटील यांच्या सह्या आहेत़ (वार्ताहर)

Web Title: Awakened citizens prevent tree trunks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.