गणेशवाडी येथील आयुर्वेद सेवा संघातर्फे पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:59 AM2018-07-28T00:59:45+5:302018-07-28T01:00:01+5:30
गणेशवाडी येथील आयुर्वेद सेवा संघाच्या महाविद्यालयात आयुर्वेद सेवा संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
पंचवटी : गणेशवाडी येथील आयुर्वेद सेवा संघाच्या महाविद्यालयात आयुर्वेद सेवा संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुभाष रानडे हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुर्वेद सेवा संघाचे डॉक्टर शरद पाठक होते. यावेळी डॉ. सुभाष पतके यांच्या ‘विदेशी ते स्वदेशी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. रानडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, मनुष्याचा आहार तो ज्या देशात राहतो तेथील निसर्गानुसार ठेवतो. ज्या देशात राहतो तेथील वनस्पती, फळभाज्या प्रामुख्याने आपल्या आहारात येतात म्हणून त्याचे सेवन केले पाहिजे, असेही ते म्हणाले. कार्यक्र माला वैद्य रजनी गोखले, राजन कुलकर्णी, य.म. बर्वे, मोना सराफ आदींसह आयुर्वेद सेवा संघाचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक अभय कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन शीतल वैद्य यांनी केले. अभिजित सराफ यांनी आभार मानले. एकनाथ कुलकर्णी यांनी स्वागत केले.
यांचा झाला गौरव
उत्तम ग्रंथ पुरस्कार म्हणून डॉ. सुभाष रानडे, सुनंदा रानडे, संशोधनपर लेख सविता कुलकर्णी, उत्तम वाचक वैभव गवळी, उत्तम रु ग्णानुभव लेखन स्वाती आंबेकर, विचार प्रवर्तक लेख योगिनी पाटील, उत्तम लेखक पुरस्कार रसिक पावसकर, पंकज दीक्षित आदींना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तर निबंध स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या केतकी कुलकर्णी, अंजली अनसिंगकर, विशाल शिंदे, चिन्मय जोशी आदींचा गौरव करण्यात आला.