साहित्यिक मेळाव्यात रंगला पुरस्कार वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:57 AM2017-09-25T00:57:30+5:302017-09-25T00:57:34+5:30
सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यात डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धा, कवी गोविंद काव्य स्पर्धा, साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक बालवाङ्मय आणि कवयित्री जयश्री पाठक पुरस्कार यांसारख्या विविध पुरस्कारांचे रविवारी (दि.२४) वितरण करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये लोकमतचे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांचा समावेश आहे.
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यात डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धा, कवी गोविंद काव्य स्पर्धा, साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक बालवाङ्मय आणि कवयित्री जयश्री पाठक पुरस्कार यांसारख्या विविध पुरस्कारांचे रविवारी (दि.२४) वितरण करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये लोकमतचे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांचा समावेश आहे. साहित्यिक मेळाव्याचे अध्यक्ष दत्ता पाटील, काव्यसंमेलनाच्या अध्यक्ष रेखा भांडारे यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यात कवी गोविंद काव्य पुरस्कार नंदकिशोर ठोंबरे यांना, रवींद्र मालुंजकर यांना द्वितीय पुरस्कार तर राजेंद्र सोमवंशी यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. डॉ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धेत रघुनाथ सावे यांना प्रथम, सुरेखा बोºहाडे यांना द्वितीय तर धनंजय आपटे यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. लक्ष्मीबाई टिळक बालवाङ्मय पुरस्कार ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक संजय वाघ यांना देण्यात आला. जयश्री पाठक स्मृती पुरस्कार रवींद्र कांगणे व रावसाहेब जाधव यांना देण्यात आला. या पुरस्कारांसाठी काशीनाथ वेलदोडे, अलका कुलकर्णी, विजयकुमार मिठे, डॉ. दिलीप पवार, शरद बिन्नोर, प्रशांत केंदळे व संतोष हुदलीकर, मिलिंद गांधी यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली. दरम्यान, साहित्यिक मेळाव्यात शनिवारी झालेल्या काव्यसंमेलनातील निवडक कवींनाही यावेळी विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात शारदा गायकवाड यांना उत्कृष्ट महिला सादरीकरणासाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर गौरव आठवले व भीमराव कोते यांना उत्कृष्ट सादरीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिजित शिंदे व प्रशांत केंदळे यांना कवी कैलास पगारे पुरस्कार विभागून देण्यात आला.