शिक्षकांना पुरस्कार वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:15 AM2017-10-13T00:15:48+5:302017-10-13T00:16:15+5:30
सटाणा : शहरातील इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनतर्फे आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार वितरण करण्यात आले. येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, तहसीलदार सुनील सौंदाणे अध्यक्षस्थानी होते.
सटाणा : शहरातील इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनतर्फे आदर्श शिक्षक सन्मान पुरस्कार वितरण करण्यात आले. येथील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, तहसीलदार सुनील सौंदाणे अध्यक्षस्थानी होते.
प्रमुख पाहुणे विभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे, गट शिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव, देवमामलेदार ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, श्रीधर कोठावदे, अॅड.सरोज चंद्रात्रे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष रूपाली कोठावदे, सचिव स्मिता येवला, रोटरी मिडटाउनचे अध्यक्ष जगदीश मुंडावरे उपस्थित होते. प्रा. डॉ. धोंडगे म्हणाले, बहुतांशी शिक्षक ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात, वाडी वस्त्यांवर, तांड्यावर, डोंगराळ भागात जेथे रस्त्यांची सोय नाही, वाहनांची सोय नाही, विजेची सोय नाही अशा दुर्गम भागामध्ये असंख्य अशी आव्हानं पेलत आपलं कर्तव्य निभावत असतात. त्यांच्यापुढे असंख्य अशा अडचणी आहेत परंतु त्यांच्या अडचणींकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडे वेळ नाही. अडचणींचा पाढा खूप मोठा अन् कठीण तरीही गुरु जी कधीच डगमगत नाही. कितीही वेदना झाल्या तरी तो आपल्या अडचणींवर पांघरूण घालून आपले अपरंपार अपार कार्य करीत असतो. कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न करता निरपेक्षवृत्तीने काम करणारे शिक्षकच आदर्श नागरिक घडवितात, असेही प्रा. डॉ. धोंडगे यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रभाकर पाटील व शांताराम बधान यांनी केले. तर आभार जगदीश मुंडावरे यांनी मानले. मान्यवरांच्या हस्ते तालुक्यातील जि. प. शिक्षकांना उल्लेखनीय कार्य करणाºया सात शिक्षकांना स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविले. कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. विद्या सोनवणे, निर्मला भदाणे, यशवंत अमृतकार, साहित्यायनचे अध्यक्ष शं. क. कापडणीस, जयवंत येवला, राजेंद्र खानकरी, किशोर गहिवड, दिलीप चव्हाण, प्रकाश सोनवणे, दिनेश सोनवणे, शांताराम बधान, अंबादास अहिरे, साहेबराव देवरे, प्रशांत वाघ, अमित सोनवणे, नितीन भामरे, सोपान खैरनार, परेश कोठावदे, काशीनाथ डोईफोडे, एस. टी. सोनवणे, वृषाली राणे, योगिता कोठावदे आदींसह शिक्षक उपस्थित होते.