कचरामुक्त शहराचा सिन्नर नगर परिषदेला पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2021 10:44 PM2021-11-20T22:44:56+5:302021-11-20T22:48:03+5:30
सिन्नर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर नगरपरिषदेला ह्यकचरा मुक्त शहरह्ण म्हणून नगर परिषद स्तरावर राज्यात दुसरे, तर देशातील पश्चिम विभागात दहावे मानांकन मिळाले.
सिन्नर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सिन्नर नगरपरिषदेला ह्यकचरा मुक्त शहरह्ण म्हणून नगर परिषद स्तरावर राज्यात दुसरे, तर देशातील पश्चिम विभागात दहावे मानांकन मिळाले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.२०) नवी दिल्ली विज्ञान भवन येथे येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी, सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्या हस्ते मुख्याधिकारी संजय केदार, स्वच्छता निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी पुरस्कार स्वीकारला.
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियानात सिन्नर नगर परिषदेने सक्रिय सहभाग घेत कचरामुक्त शहर व्हावे यासाठी विशेष कार्य केले आहे. या कार्यात सिन्नर नगर परिषदेला महाराष्ट्र राज्यात दुसरे मानांकन मिळाल्याने सिन्नर नगर परिषदेसह सर्व सिन्नरवासीयांत आनंदाचे वातावरण संचारले आहे.
आपले सिन्नर स्वच्छ व सुंदर असावे यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी-कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांनी आपल्या दैनंदिन कार्यात स्वच्छतेला प्राधान्य देऊन उल्लेखनीय कार्य केले. या कार्यास सिन्नरवासीयांनी योग्य साथ दिल्याने हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
- किरण डगळे, नगराध्यक्ष
नागरी सुविधा पुरविणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेची मुख्य जबाबदारी आहे. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देऊन आपले सिन्नर शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी संपूर्ण आरोग्य विभाग कार्य करतो. स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत मागील काही वर्षांत स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य देत सिन्नर नगर परिषदेने कार्य केले आहे, त्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारामुळे सिन्नर नगर परिषदेची जबाबदारी आणखी वाढली आहे.
- संजय केदार, मुख्याधिकारी
आरोग्य विभागाच्या सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी योग्य जबाबदारी पूर्ण करीत सिन्नर शहरास स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी अविरत कार्य केले. या पुरस्कारामुळे आम्ही केलेल्या कार्याचा योग्य तो सन्मान आज प्राप्त झाल्याचा आनंद झाला आहे.
- रवींद्र देशमुख, स्वच्छता निरीक्षक