स्मितहर्ष संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:20 PM2019-06-16T23:20:05+5:302019-06-17T00:04:57+5:30

स्मितहर्ष एज्युकेशन अकॅडमी या संस्थेच्या वतीने राज्यभरातील आदर्श परिचारिका व सामाजिक कार्यकर्त्यांना या स्मितहर्ष पुरस्कार प्रदान करण्यात आले.

 Award by Smythrahas Institute | स्मितहर्ष संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान

स्मितहर्ष संस्थेतर्फे पुरस्कार प्रदान

Next

नाशिक : स्मितहर्ष एज्युकेशन अकॅडमी या संस्थेच्या वतीने राज्यभरातील आदर्श परिचारिका व सामाजिक कार्यकर्त्यांना या स्मितहर्ष पुरस्कार प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र धामणे, राष्टÑवादी कॉँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सुनील करांदे, अशेक इंगवले, संजय खानविलकर, वैशाली बेदमुथा, प्रा. राजेश बेदमुथा आदी उपस्थित होते. यावेळी धामणे यांनी समाज विकासासाठी महिलांचे मोठे योगदान असल्याचे सांगितले. तसेच संस्थेचा व पुरस्कारार्थी महिलांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी विविध क्षेत्रातील महिलांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक राजेश बेदमुथा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. लोकेश पारख यांनी केले. आभार हर्ष बेदमुथा यांनी मानले. कार्यक्रमास प्रफुल्ल भुते, पूनम राजपूत आदी उपस्थित होते.
विविध पुरस्कारार्थींचा गौरव
४स्मितहर्ष आदर्श परिचारिका पुरस्कार - भावना गावित, पूजा उबाळे, स्वाती ठाकूर, पूजा गोसावी, मेरी जेम्स, उज्ज्वला दाणी, एस्तर देरापूरकर, मनीषा मोगल, अर्चना पटाईत, उज्ज्वला हिवाळे, विशाखा मोरे, अमोल पाटील, शाशिकांत सोनवणे, संगीता गोसावी यांना देण्यात आला.
४स्मितहर्ष परिचारिका रत्न पुरस्कार - मीनल मोहाडीकर, अरुणा भराडे, ललिता विल्सन, अरुंधती गुरव, माधुरी गिरी, कल्पना भामरे, शीतल गिरी, सोनाली जगधणे, पौर्णिमा नाईक, शीतल पाटील चांदेकर, सारिका मगर यांना देण्यात आला.
४स्मितहर्ष रणरागिणी पुरस्कार - मंदाकिनी बागुल, माधुरी कुलकर्णी, पूनम आचार्य, लावण्या गायकवाड, आरती बनसोडे, वंदना बारणे, मंजू मराठे, स्मिता दुसाने, संगीता गुरव, राजश्री विरणक, कीर्ती भांगडिया, कल्पना तलमले, रेखा पाठक, पूनम राजपूत उपाध्याय, रंजना संखे, मनीषा शार्दुल, भारती धकड, लता बोरोले, जयश्री सावर्डेकर, स्नेहा कोकणे-पाटील, अ‍ॅड. सोनाली सूर्यवंशी, भीमा जाधव, रोहिणी काळे, कुंदा चंदणे, योगीता चव्हाण, सीमा शिंदे, मालती माळी यांना प्रदान करण्यात आला. तसेच स्मितहर्ष झाशीची राणी पुरस्कार संगीता पाटील यांना प्रदान करण्यात आला.

Web Title:  Award by Smythrahas Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक