विज्ञान प्रदर्शनात वटार जिल्हा परिषद शाळेला पारितोषिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 03:57 PM2020-01-02T15:57:55+5:302020-01-02T15:58:21+5:30

वटार : सटाणा येथील श्री शक्ती शिक्षण संस्था नाशिक संचलित,डिव्हाईन इंग्लिश मेडीयम स्कूल येथे झालेल्या दोन दिवसीय बागलाण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वटार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी (प्राथमिक विभागातील) तृतीय क्र मांकाचे पारितोषिक मिळविले.

 Award for Vatara Zilla Parishad School in Science Exhibition | विज्ञान प्रदर्शनात वटार जिल्हा परिषद शाळेला पारितोषिक

 वटार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाा पारितोषिक देतांना गटशिक्षण अधिकारी टी. के.धोंडगे, विस्ताराधिकारी विजय पगार, कैलास पगार डी. बी. ह्याळीज,प्रकाश देवरे, कैलास काकुळते, आदी

Next
ठळक मुद्दे विज्ञान प्रदर्शनातील प्रमुख विषय असलेल्या शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान अंतर्गत नकाशा वाचन या विषयात जिल्हयाची नावे, क्षेत्रफळ,महाराष्ट राज्याची लांबी रु ंदी,सागर किनारपट्टी, किल्ले,शिखर,नद्या,यांची ओळख या प्राविण्य दाखवत कोणतीही माहिती काही क

प्रमुख पाहुणे बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रांतअधिकारी विजयकुमार भांगरे, उपशिक्षणाधिकारी के.डी. मोरे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गटविकास अधिकारी पी.एस. कोल्हे,गटशिक्षणाधिकारी टी.के धोंगडे,विस्ताराधिकारी विजय पगार, कैलास पगार विज्ञान अध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष डी. बी. ह्याळीज,तालुक्यातील केंद्रप्रमुख ,बागलान तालुका गणित - विज्ञान अध्यापक संघाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याधापक प्रकाश देवरे, कैलास काकुळते, देविदास अ हिरे, सावित्री देवरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title:  Award for Vatara Zilla Parishad School in Science Exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.