बगडाणे यांना जीवनदूत पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 09:21 PM2021-02-22T21:21:40+5:302021-02-23T23:35:03+5:30

सटाणा : येथील सामाजिक कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील अपघातग्रस्तांना थेट घटनास्थळी जाऊन तातडीने वैद्यकीय सेवा पुरवणारे शामकांत बगडाणे यांना नाशिक येथे राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते जीवनदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Awarded the Lifetime Achievement Award to Bagdane | बगडाणे यांना जीवनदूत पुरस्कार प्रदान

बगडाणे यांना जीवनदूत पुरस्कार प्रदान

Next

नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरात ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या समारोप सोहळ्यात बगडाणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. बगडाणे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. गेल्या पंधरा वर्षात जिल्ह्यातील रस्ते अपघातात थेट घटनास्थळी पोहोचत रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आणि त्यांना जीवदान देणे, तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या दुर्धर आजारावरील अनेक गरजू रुग्णांना स्वखर्चाने घेऊन जात नाशिक, मुंबई, पुणे येथील रुग्णालयात शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांच्यावर मोफत उपचार करण्याचे कार्यही बगडाणे अविरतपणे करत आहेत.

Web Title: Awarded the Lifetime Achievement Award to Bagdane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.