‘नाशिक भूषण’ पुरस्कार जायभावे यांना प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 12:01 AM2020-07-02T00:01:09+5:302020-07-02T00:31:01+5:30
भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक असून, जलद न्याय मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अॅड. जयंत जायभावे यांनी केले आहे.
नाशिक : भारतात सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची निर्मिती ही समता, न्याय व स्वातंत्र्य या नीतिमूल्यांची जोपासना करून लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता व बंधुता वाढविण्यासाठी करण्यात आलेली असून, सध्याच्या काळाजी गरज पाहता सामाजिक परिस्थितीनुसार कायद्यात बदल आवश्यक असून, जलद न्याय मिळणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन अॅड. जयंत जायभावे यांनी केले आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीला नैसर्गिक मूलभूत अधिकार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे न्याय व वकिली क्षेत्रातीस अॅड. जयंत जायभावे यांना न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन ‘नाशिक भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीष चिंधडे, निवड समिती अध्यक्ष रवि महादेवकर आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन हेमंत मराठे यांनी केले, तर सचिव डॉ. श्रीया कुलकर्णी यांनी आभार मानले. या पुरस्कार सोहळ्याचे फेसबुक व यू ट्यूबच्या माध्यमातून थेट प्रसारण करण्यात आले होते.
न्यायाधीश अरुण ढवळे यांनी मार्गदर्शन करताना वकिलांनी सचोटीने, अभ्यासपूर्वक लोकांकरिता तळमळ ठेवून काम करण्याचा कानमंत्र दिला. तसेच या कामातूनच समाजासाठी वकिली पेशाचे महत्त्व वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.