इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्याला दिल्लीत पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 09:41 PM2019-07-07T21:41:24+5:302019-07-07T21:42:13+5:30
घोटी : दैनंदिन आहारात अत्यल्प मिळणाऱ्या लोह या पोषकतत्त्वाअभावी होणाºया रक्तक्षय या आजाराशी कोट्यवधी नागरिक झुंज देत आहे. या सर्वांसाठी खरगपूर येथील आयआयटी संस्थेने लोहयुक्त तांदळाची निर्मिती केली आहे. या संशोधनात इगतपुरी तालुक्यातील संशोधक विद्यार्थी चंद्रकांत दालभगत यांनी बहुमोल भूमिका बजावली.
घोटी : दैनंदिन आहारात अत्यल्प मिळणाऱ्या लोह या पोषकतत्त्वाअभावी होणाºया रक्तक्षय या आजाराशी कोट्यवधी नागरिक झुंज देत आहे. या सर्वांसाठी खरगपूर येथील आयआयटी संस्थेने लोहयुक्त तांदळाची निर्मिती केली आहे. या संशोधनात इगतपुरी तालुक्यातील संशोधक विद्यार्थी चंद्रकांत दालभगत यांनी बहुमोल भूमिका बजावली.
नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात झालेल्या कार्यक्रमात चंद्रकांत दालभगत यांना केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या भाषणात इगतपुरीसारख्या दुर्गम तालुक्यातील संशोधक विद्यार्थ्याचे संशोधन देशाला उपयोगी असल्याचे गौरवोद्गार काढले. गांधी युवा प्रोद्योगिकी आविष्कार २०१९ हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार इगतपुरी तालुक्यातील विद्यार्थ्याला मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
चंद्रकांत दालभगत आणि कृषी व अन्न अभियांत्रिकी विभागाने संशोधित केलेला लोहयुक्त तांदूळ कुपोषणाच्या भीषण समस्येवर मात करण्यासाठी प्रभावी उपाय ठरणार आहे. केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने सरासरी शंभर किलो प्रतिदिन उत्पादन क्षमतेचा लोहयुक्त तांदूळ निर्मितीचा प्रायोगिक प्रकल्पसुद्धा साकारण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या मेक इन इंडियाच्या धर्तीवर लोहयुक्त तांदळाच्या प्रकल्पासाठी देशी बनावटीची यंत्रसामग्री तयार करण्यात आली आहे. या प्रकल्पातून निर्मित तांदूळ देशभरातील अंगणवाड्या आणि शाळांतील माध्यान्ह भोजन योजनेतून देण्यासाठी शासनाचा विचार सुरू आहे. इगतपुरी तालुक्याच्या भूमिपुत्र असणाºया चंद्रकांत दालभगत या विद्यार्थ्याने या संशोधनात दिलेल्या योगदानाचे जिल्ह्यात कौतुक होत आहे.
या संशोधनासाठी महात्मा गांधी युवा प्रोद्योगिकी आविष्कार २०१९ हा राष्ट्रीय पुरस्कार चंद्रकांत दालभगत यांना दिल्ली येथे वितरित करण्यात आला. याप्रसंगी रघुनाथ माशेलकर, जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप, प्रा. अनिल गुप्ता, वडील गेणू दालभगत, मार्गदर्शक हरी निवास मिश्रा, माजी सभापती रघुनाथ तोकडे, पोलीसपाटील वाळू ठवळे उपस्थित होते. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या भाषणात कौतुक करून आपल्या ट्विटर हँडलवरही शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
अन्न अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक एच. एन.
मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी चंद्रकांत दालभगत व सहकारी यांनी या लोहयुक्त तांदळाची निर्मिती केली आहे. यासाठी आवश्यक असणारे अनेक प्रयोग संस्थेतील फूड केमिस्ट्री आणि टेक्नॉलॉजी या प्रयोगशाळेत करण्यात आले आहे.
मुख्य अन्न म्हणून वापर
प्रा. एच. एन. मिश्रा सांगतात की, रोजच्या आहारात लोहयुक्त पदार्थाचे कमी सेवन, अन्नात लोहाचा समावेश नसणे यामुळे रक्तक्षय होतो. त्यातच देशातील अनेकांच्या रोजच्या आहारात तांदळाचा मोठ्या प्रमाणात मुख्य अन्न म्हणून वापर होतो. या पार्श्वभूमीवर संशोधक विद्यार्थी चंद्रकांत दालभगत यांच्यासह सहकाऱ्यांच्या संशोधनाला यश आले आहे.