दातली ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:17 AM2021-08-22T04:17:02+5:302021-08-22T04:17:02+5:30
ग्रुप ग्रामपंचायत दातली अंतर्गत दातली, केदारपूर व शहापूर येथे पाणीपुरवठा व स्वच्छता अनुषंगिक कामाचे उत्तम प्रकारे नियोजन केल्याने, तसेच ...
ग्रुप ग्रामपंचायत दातली अंतर्गत दातली, केदारपूर व शहापूर येथे पाणीपुरवठा व स्वच्छता अनुषंगिक कामाचे उत्तम प्रकारे नियोजन केल्याने, तसेच दातली येथे दोन ठिकाणी व शहापूर या गावांमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था म्हणून जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित केलेले आहे. कार्यालय पूर्णपणे सौरऊर्जेवर आधारित केले आहे. गावात ठिकठिकाणी सौर पथदिवे यांचा वापर करण्यात आलेला आहे, तसेच दशक्रिया विधी परिसर शेड व इतर सार्वजनिक ठिकाणी वृक्षलागवड करून यशस्वीपणे जतन केलेले आहेत. गावातील सर्वांकडे व्यक्तिगत शौचालयाची बांधणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे सर्व लेखे ऑनलाइन संगणकीय प्रणालीमध्ये नियमितपणे भरण्यात येत आहे, तसेच ग्रामस्थांना सर्व दाखले संगणीकृत देण्यात येत आहेत. वरील सर्व कामकाजाच्या आधारे २०१९-२० या वर्षामध्ये सिन्नर तालुक्यात ग्रुप ग्रामपंचायत दातली यांना सर्वात जास्त गुण प्राप्त झाल्याने ग्रुप ग्रामपंचायत दातलीची स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
----------------
फोटो ओळी : सिन्नर तालुक्यातील दातली ग्रामपंचायतीस स्मार्ट ग्राम पुरस्कार पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते स्वीकारताना सरपंच हेमंत भाबड, परेश जाधव. (२१ दातली)
210821\21nsk_8_21082021_13.jpg
२१ दातली