ठाणगाव आरोग्य केंद्राच्यावतीने कोरोनाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 05:48 PM2020-03-19T17:48:23+5:302020-03-19T17:49:03+5:30

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने आशा कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करुन त्यांच्याकडून घरोघर जाऊन कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

 Awareness about Corona on behalf of Thangaon Health Center | ठाणगाव आरोग्य केंद्राच्यावतीने कोरोनाबाबत जनजागृती

ठाणगाव आरोग्य केंद्राच्यावतीने कोरोनाबाबत जनजागृती

Next

ठाणगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत १९ गावांचा समावेश असून यात अनेक उपकेंद्रांचा समावेश आहे. ठाणगाव केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. धादवड यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरातील सर्व आशा कार्यकर्त्यांना एकत्र बोलवून कोरोनाबाबत जनजागृती करण्यासंबंधी सूचना केल्या. त्यापध्दतीने सर्व आशा कार्यकर्ता महिला घरोघरी जाऊन कोरोनाबाबत सार्वजनिक ठिकाणी थूंकू नये, वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे आढळल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा अशा सूचना देण्यात येत आहेत. कोरोना या विषाणूंचा प्रादूर्भाव होणार नाही यासाठी ठाणगाव केंद्रासह पंधरा ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. या कार्यशाळेस आरोग्य सेवक एस. जी. काळे, एस. डी. कहांडाळ, नितीन घोटेकर, शारदा शेलार, सुनीता भागवत, शांता शेळके यांच्यासह परिसरातील आशा कार्यकर्ता उपस्थित होत्या.

Web Title:  Awareness about Corona on behalf of Thangaon Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.