दादा कोंडकेंच्या वेशात जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 11:53 PM2020-04-08T23:53:34+5:302020-04-08T23:53:46+5:30
येवला तालुक्यातील देवठाण मूळगाव असलेले व सध्या कोपरगाव येथे वास्तव्य असलेले मिमिक्र ी कलावंत संदीप जाधव हे दादा कोंडके यांच्या वेशभूषेत कोरोनावर जनजागृती करीत असून त्यांची दादा कोंडके यांच्या वेशभूषेतील आणि आवाजातील व्हिडीओ कोपरगाव आणि येवला तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहेत.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील देवठाण मूळगाव असलेले व सध्या कोपरगाव येथे वास्तव्य असलेले मिमिक्र ी कलावंत संदीप जाधव हे दादा कोंडके यांच्या वेशभूषेत कोरोनावर जनजागृती करीत असून त्यांची दादा कोंडके यांच्या वेशभूषेतील आणि आवाजातील व्हिडीओ कोपरगाव आणि येवला तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत असून, गर्दी टाळा, तोंडाला मास्क बांधा, हात साबणाने स्वच्छ धुवा, सॅनिटायझरचा वापर करा, पोलिसांना सहकार्य करा, काळजी घ्या, घरातच थांबा असा संदेश ते देत आहेत. माझ्यासोबत अनेक कलाकार काम करतात. मात्र, संचारबंदीच्या काळात ते बेरोजगार झाले आहेत. सर्व लोककला बंद आहेत. त्यामुळे कोरोनाविषयी जागृती केली जात असल्याचे संदीप जाधव यांनी सांगितले.