दुपारी जागानिश्चिती, रात्री टपऱ्या उचलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:13 AM2018-04-05T00:13:40+5:302018-04-05T00:13:40+5:30
महापालिकेने दुपारी फेरीवाल्यांची बैठक घेऊन जागा निश्चित केली. त्यानुसार सायंकाळी चौकातील सर्व टपºया आणि हातगाड्या एकाच ठिकाणी ठेवून संबंधित व्यावसायिकांनी पूजा केली. परंतु कुणाची दृष्ट लागली आणि टपºयांचा फोटो पालिकेवर पाठविण्यात आला. रात्री तडक अकरा- साडेअकरा वाजता या टपºयाच महापालिकेने उचलून नेल्या.
नाशिक : महापालिकेने दुपारी फेरीवाल्यांची बैठक घेऊन जागा निश्चित केली. त्यानुसार सायंकाळी चौकातील सर्व टपºया आणि हातगाड्या एकाच ठिकाणी ठेवून संबंधित व्यावसायिकांनी पूजा केली. परंतु कुणाची दृष्ट लागली आणि टपºयांचा फोटो पालिकेवर पाठविण्यात आला. रात्री तडक अकरा- साडेअकरा वाजता या टपºयाच महापालिकेने उचलून नेल्या. महात्मानगर रस्त्यावरील पारिजातनगर चौफुलीवर हा प्रकार घडल्यानंतर पालिकेच्या दुटप्पी धोरणाने सारेच अचंबित झाले असून, प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या सोमवारी हा प्रकार घडला. पारिजातनगर चौफुलीवर लहान-मोठ्या सहा ते सात टपºया असून, त्या एकाच जागी ठेवून नियमित करण्यासाठी दुपारी पश्चिम विभागीय कार्यालयात बैठक झाली. त्यानुसार महापालिकेच्या अटी-शर्ती घालून देण्याचे ठरविण्यात आले. पाठोपाठ जागादेखील आखून देण्यात आल्या. त्यानुसार विक्रेत्यांनी गाड्या- टपरीचे स्थलांतर केले. आणि नूतन जागेच्या ठिकाणी व्यवसाय करीत असल्याने पूजाअर्चाही करण्यात आली. परंतु रात्रीच्या वेळी कोणीतरी महापालिकेच्या वरिष्ठांकडे तक्रार केली आणि रात्री अकरा- साडेअकरा वाजता अतिक्रमण विभागाने काही टपºया उचलून नेल्या, तर काही दुसºया दिवशी सकाळी नेल्या.
एसटी कॉलनीबाबतही अलीकडे महापालिकेने असाच गोंधळ घातला. रस्त्याच्या लगत महापालिकेनेच दिलेल्या ५४ नियमित टपयाहटविल्या आणि त्यासाठी न्यायालयीन लढाई जिंकली. रस्ता रुंदीकरणात सदरच्या टपºया येत असल्याचे कारण दिले आणि त्याच ठिकाणी आता हॉकर्स झोनचा फलक लावला आहे.