गोदाघाटावर प्लॅस्टिकविरोधात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:35+5:302020-12-12T04:31:35+5:30

मागील पाच वर्षांपासून मानव उत्थान मंचतर्फे प्लॅस्टिकमुक्ती दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या माध्यमातून प्लॅस्टिक वापरामुळे होणारे दुष्परिणाम यासंदर्भात जनजागृती केली ...

Awareness against plastic at Godaghata | गोदाघाटावर प्लॅस्टिकविरोधात जनजागृती

गोदाघाटावर प्लॅस्टिकविरोधात जनजागृती

Next

मागील पाच वर्षांपासून मानव उत्थान मंचतर्फे प्लॅस्टिकमुक्ती दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या माध्यमातून प्लॅस्टिक वापरामुळे होणारे दुष्परिणाम यासंदर्भात जनजागृती केली जाते. प्लॅस्टिक वापरामुळे आरोग्य पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात घातक परिणाम होतात म्हणून नागरिकांनी प्लॅस्टिक वापरणे टाळले पाहिजे तसेच प्लॅस्टिकविरोधी विविध प्रकारचे जनजागृती, प्रबोधनाचे कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचे जाधव यांनी सांगितले. येत्या रविवारपर्यंत प्लॅस्टिक मॉंस्टर रामकुंडावर ठेवला जाणार असून, त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी फिरून प्लॅस्टिकविरोधात जनजागृती केली जाणार आहे. झकिया शेख, पंकज जोशी, विश्वनाथ ढाके, विष्णू नायर, शंतनू कोळी, पुखराज आदींनी प्लॅस्टिक मॉंस्टर तयार केला. याप्रसंगी कार्यक्रमाला जगबीर सिंग, निशिकांत पगारे, योगेश बर्वे, सोमनाथ मुठाळ, एकनाथ सावळे, मिलिंद बाबर, कुलदीप कौर, वैशाली चव्हाण, आरोग्य अधिकारी कल्पना कुटे, विभागीय अधिकारी विवेक धांडे, संजय दराडे उपस्थित होते.

Web Title: Awareness against plastic at Godaghata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.