नागरिकांच्या जागरुकतेमुळे वाचले पक्ष्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2021 08:01 PM2021-01-05T20:01:12+5:302021-01-06T00:54:49+5:30

देवळा : तालुक्यातील मकरंदवाडी परिसरात शेतात सापडलेल्या आफ्रिकन ब्ल्यू क्रेन (क्रौंच ) पक्ष्याला देवळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेऊन योग्य ते उपचार करण्यात आले. त्यास वनविभागाच्या कार्यालयात सुरक्षितपणे ठेवण्यात आले असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

Awareness of the citizens saved the life of the bird | नागरिकांच्या जागरुकतेमुळे वाचले पक्ष्याचे प्राण

नागरिकांच्या जागरुकतेमुळे वाचले पक्ष्याचे प्राण

Next

मकरंदवाडी येथील शेतकरी गुलाब भदाणे मंगळवारी शेतात काम करीत असताना आकाशातून एक पक्षी अचानक शेतात कोसळल्याचे त्यांनी पाहिले. परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांपेक्षा हा पक्षी त्यांना आकाराने मोठा व अनोळखी वाटला. भदाणे यांनी या पक्ष्याला उचलून आपल्या शेतातील चाळीत सुरक्षितपणे ठेवले व देवळा वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे वनपाल डी.पी. गवळी, वनरक्षक जी.जी. पवार आदी कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पक्षी त्यांनी ताब्यात घेऊन त्यास त्वरित उपचारासाठी पशुधन विकास अधिकारी झेंबरे यांच्याकडे आणले. योग्य ते उपचार केल्यानंतर ह्या पक्ष्याचे प्राण वाचवण्यात यश आले.
आफ्रिकन ब्ल्यू
हा पक्षी आफ्रिकन ब्ल्यू क्रेन जातीचा असून हा पक्षी अंदाजे आठ हजार सातशे कि.मी.चा प्रवास करून आलेला आहे. तो नांदूरमधमेश्वर येथील पक्षी अभयारण्यात जात असताना अशक्तपणामुळे तो खाली पडला असावा, असा अंदाज वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. पाटील यांनी व्यक्त केला. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे पक्ष्याची प्रकृती सुधारत असून वनविभागाने त्यास नैसर्गिक वातावरणात ठेवले आहे. उडण्यायोग्य झाल्यानंतर त्यास पुन्हा सोडण्यात येणार आहे.

Web Title: Awareness of the citizens saved the life of the bird

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.