येवला येथे सायकल फेरीद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 10:38 PM2020-01-19T22:38:14+5:302020-01-20T00:14:26+5:30
नेहरू युवा केंद्राच्या वतीने सशक्त भारत अभियानांतर्गत सायकल फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली. फेरीमध्ये येवला शहर व परिसरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, तर पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सांस्कृतिक व सामाजिक कार्य ग्रुपच्या ४० सायकलप्रेमींनी लक्ष वेधून घेतले.
येवला : नेहरू युवा केंद्राच्या वतीने सशक्त भारत अभियानांतर्गत सायकल फेरीद्वारे जनजागृती करण्यात आली. फेरीमध्ये येवला शहर व परिसरातील युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला, तर पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सांस्कृतिक व सामाजिक कार्य ग्रुपच्या ४० सायकलप्रेमींनी लक्ष वेधून घेतले.
बनकर पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रवीण बनकर यांनी सायकलप्रेमींचे स्वागत केले. नेहरू युवा केंद्राचे युवा राष्ट्रीय स्वयंसेवक मुकुंद अहिरे, महेश शेटे, प्राचार्य पंकज निकम, दीपक देशमुख, विजय भोरकडे, किरण खोकले, संदीप भोरकडे, गणेश मोरे, कैलास सालमुठे, संजय करंजकर आदींनी सहभाग सायकल फेरीत नोंदवला. पंकज मढवई यांनी आभार मानले.
बाल सायकलप्रेमी पार्थ खराडे याचा सत्कार
स्पर्धेचे विशेष म्हणजे बाल सायकलप्रेमी पार्थ खराडे हा कारेगाव येथून एकटाच सायकल चालवत येवल्यात पोहोचला व त्याने यशस्वी सायकल फेरी पूर्ण केली. याप्रसंगी त्याचा जय भवानी ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला.