अन्न औषध प्रशासन विभागाची जागृतता दिवाळीसणाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 06:20 PM2020-10-27T18:20:02+5:302020-10-27T18:20:32+5:30

वणी : येत्या काही दिवसात दिवाळी हा सर्वात मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य अबाधित राहवे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने यास अनुसरुन कार्यप्रणालीची दिशा निश्चित करणे आवश्यक आहे.

Awareness of the Food and Drug Administration is essential on the backdrop of Diwali | अन्न औषध प्रशासन विभागाची जागृतता दिवाळीसणाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक

अन्न औषध प्रशासन विभागाची जागृतता दिवाळीसणाच्या पार्श्वभुमीवर आवश्यक

googlenewsNext
ठळक मुद्देअपायकारक वस्तु विक्रीवर कडक कायदेशीर कारवाई असे धोरण

वणी : येत्या काही दिवसात दिवाळी हा सर्वात मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आरोग्य अबाधित राहवे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने यास अनुसरुन कार्यप्रणालीची दिशा निश्चित करणे आवश्यक आहे.

दिवाळी सणाला पिठीसाखर, रवा, तेल, तुप डाळीचे पिठ, पोहे व अशा अनेकविध घरगुती स्वरुपाच्या वस्तु तयार करण्यासाठी खरेदीसाठीचे नियोजन गृहीणीवर्गाकडुन सुरु आहे. लाडु,शंकरपाळे, करंजी, पुरी, चकल्या या व अशा इतर वस्तुंसाठी नमुद वस्तु दर्जेदार पद्धतीच्या खरेदीसाठी चोखंदळ ग्राहकांचा कल असतो यापासुन चांगले पदार्थ तयार करावे कुटुंबासमवेत त्याचा आस्वाद घ्यावा व आरोग्यावर याचा प्रतिकुल परिणाम न होता आनंदात सण घरगुती स्वरुपात साजरा करण्याची प्रत्येक कुटुंबियांची ईच्छा व अपेक्षा असते.


बाजारातील दुकानातुन पैशाच्या मोबदल्यात दर्जेदार व चांगल्या पद्धतीच्या वस्तु मिळण्यासाठी लगबग असते. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणाआपापल्या परीने कार्यरतआहेत.

दरम्यान भेसळयुक्त वस्तु बाजारात विक्रीसाठी आणु नये तसेच अपायकारक वस्तु विक्रीवर कडक कायदेशीर कारवाई असे धोरण अन्न व औषध प्रशासन विभागाचे असले तरी ते कागदावर न राहता त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी कोरोना काळात तरी व्हावी अशा नागरिकांच्याभुमिकेबरोबर प्रशासनाचीही भुमिका असणे हा प्रशासनावरील विश्वासाचा एक भाग आहे. एखादी माहीती मिळाली की पडताळणी करणे, तातडीने कारवाई करणे अशा प्रक्रीयापार पडल्या तर अप्रिय घटना टाळता येतील व ज्या उद्देशाने सदर विभाग नियुक्त आहे त्याचा उद्देश सफल होईल अशी अपेक्षा नागरीक व्यक्त करीत आहे.

Web Title: Awareness of the Food and Drug Administration is essential on the backdrop of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.