पंचवटीत गणेशोत्सव मंडळांकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:37 PM2020-08-29T23:37:41+5:302020-08-30T01:17:33+5:30

पंचवटी : कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी प्रशासनाने अगदी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केल्याने त्यानुसार सर्वच मंडळांनी कोणत्याही प्रकारचे देखावे व आरास न करता केवळ गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करत विविध सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम तसेच आगमन व विसर्जन मिरवणुक रद्द केलेली आहे.

Awareness from Ganeshotsav Mandals in Panchavati | पंचवटीत गणेशोत्सव मंडळांकडून जनजागृती

पंचवटीत गणेशोत्सव मंडळांकडून जनजागृती

Next
ठळक मुद्देआरास नाही । कोरोना पार्श्वभूमीवर सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्द

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी प्रशासनाने अगदी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना केल्याने त्यानुसार सर्वच मंडळांनी कोणत्याही प्रकारचे देखावे व आरास न करता केवळ गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करत विविध सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम तसेच आगमन व विसर्जन मिरवणुक रद्द केलेली आहे.
गणेशोत्सव साजरा करताना प्रशासनाने कोरोना पार्श्वभूमीवर अनेक नियमावली तयार करून त्याची मंडळांना अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार पंचवटीत अनेक गणेशोत्सव मंडळांनी देखावे व आरास न करता कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी कोणत्या उपाय-योजना कराव्यात यासाठी गणेश मंडपाच्या बाहेर फलक लावून तर काहींनी होतकरू देखावे, आरास नाही । कोरोना पार्श्वभूमीवर सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्दनागरिकांना, शालेय विद्यार्थ्यांना मोफत सॅनिटायझर्स तसेच मास्क वाटप कार्यक्रम राबविले आहे.
रामवाडी येथील विक्रांत युवक मित्रमंडळाचे गणेशोत्सव स्थापनेचे ४५ वे वर्ष असून, यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी यासाठी परिसरात रिक्षाला ध्वनिक्षेपक लावून माहिती देण्याचे काम मंडळाच्या वतीने करण्यात आले असे मंडळाचे संजय बागुल यांनी सांगितले. सरदारचौक मित्रमंडळाचे गणेशोत्सव साजरा करण्याचे यंदा ९६वे वर्ष असून, कोरोनामुळे कोणताही देखावा न करता शाडू मातीची मूर्ती मंडपात बसविण्यात आलेली आहे.
पेठरोडवरील श्रीमान सत्यवादी मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी सामाजिक देखावे साकारून समाजप्रबोधन केले जाते, यावर्षी कोरोना संकट लक्षात घेऊन वाचनालयात गणेशमूर्ती प्रतिष्ठापना करत बाहेर कोरोना विषाणूंपासून संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी मास्क वापरा, वेळोवेळी हात स्वच्छ धुवा, बोलताना पाच फूट अंतर ठेवा असा फलक लावून जनजागृती केली आहे, असे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण धोत्रे यांनी सांगितले.
हिरावाडी कमलनगर येथील कै. दत्ताजी मोगरे फ्रेण्ड सर्कल, दुर्गा फ्रेण्ड सर्कल यांच्या वतीने फलक उभारत नागरिकांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय दखल घेतली पाहिजे याबाबत विविध सूचना मांडल्या आहेत तसेच शेवटच्या दोन दिवस प्रभागात नागरिकांना विशेषत: ज्येष्ठांना व लहान मुलांना मास्क आणि सॅनिटायझर्स वाटप केले जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर मोगरे यांनी सांगितले.
नवीन आडगाव नाका मित्रमंडळाने सर्वच सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम रद्द करून त्याबदल्यात प्रभागातील नागरिकांना विशेषत: लहान मुले व होतकरू नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी शेवटच्या तीन दिवस मास्क, सॅनिटायझेर्स वाटप करण्यात येणार आहे असे समाधान जाधव यांनी सांगितले. पंचवटी कारंजा येथिल गुरुदत्त शैक्षणिक सामाजिक कला व क्रीडा मंडळातर्फे शेवटच्या चार दिवस सॅनिटायझर्स मास्क वाटप केले जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष गुलाब भोये यांनी सांगितले.

Web Title: Awareness from Ganeshotsav Mandals in Panchavati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.