बालकांच्या मास्क, स्वच्छतेविषयी पालकांची जागृती आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:10 AM2021-06-27T04:10:56+5:302021-06-27T04:10:56+5:30
नाशिक : बालकांच्या आरोग्यासाठी त्यांची वैयक्तिक स्वच्छतेची काळजी व मास्कसारख्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत पालकांनी जागृत राहणे आवश्यक असल्याचे ...
नाशिक : बालकांच्या आरोग्यासाठी त्यांची वैयक्तिक स्वच्छतेची काळजी व मास्कसारख्या प्रतिबंधात्मक उपायांबाबत पालकांनी जागृत राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जोधपूर येथील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण राजस्थान आयुर्वेद विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अभिमन्यू कुमार यांनी केले आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे कोविड-१९ संदर्भात ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी आरोग्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व्याख्यानमालेस महाराष्ट्र चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष तथा विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. आशुतोष गुप्ता, विद्यापीठाचे आयुर्वेद विद्याशाखेचे मा. अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते. ‘केअर ऑफ चिल्ड्रन इन कोविड-१० पॅण्डेमिक’ विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. अभिमन्यू कुमार यांनी कोविड-१९ आजारानंतर होणारे इतर विविध व्याधी व आजार टाळण्यासाठी आयुर्वेदिक व नैसर्गिक उपचार पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन केले. केंद्रीय आयुष मंत्रालयाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना संकेतस्थळावर पत्त्द्धध्द केल्याचेही त्यांनी नमूद करतानाच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातील रुग्णांची काळजी घ्यावी व प्रतिबंधात्मक उपाय व सकस आहाराचे सेवन करण्याचा सल्ला दिला.