बाललैंगिक शोषण प्रतिबंध कायद्याची शिक्षकांमध्ये जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:29 PM2019-12-22T23:29:58+5:302019-12-23T00:18:51+5:30
शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक वा मानसिक शिक्षा न करता सुसंवादातून समुपदेशन करून मार्ग काढावा तसेच बालकांचे कुणी लैंगिक शोषण करीत असेल तर तातडीने दखल घेत चाइल्ड लाइन १०९८ क्रमांकावर संपर्कसाधावा, असे आवाहन येथील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले.
कळवण : शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना शारीरिक वा मानसिक शिक्षा न करता सुसंवादातून समुपदेशन करून मार्ग काढावा तसेच बालकांचे कुणी लैंगिक शोषण करीत असेल तर तातडीने दखल घेत चाइल्ड लाइन १०९८ क्रमांकावर संपर्कसाधावा, असे आवाहन येथील पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केले.
शालेय गुणवत्ता वाढावी यासाठी प्राथमिक स्तरावरील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे सबलीकरण होण्याच्या दृष्टीने निष्ठा हा पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आरकेएम विद्यालयात झाला. त्यात पोक्सो अॅक्ट बालकाचे लैंगिक शोषण प्रतिबंध अधिनियम २०१२ या विषयावर नीलेश भामरे यांनी पीपीटीद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी डी. ए. पवार, प्राचार्य एल. डी. पगार, केंद्रप्रमुख रमेश शिंदे, सुभाष भामरे यांच्यासह राज्य समन्वयक प्रदीप शिंदे व तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते. लैंगिक शोषण व अत्याचार याबाबत पोलीस निरीक्षक वाघ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. गुन्हे होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी याची माहिती दिली. यावेळी लहान मुलांना गुड टच, बॅड टच याबाबतची कोमल ही लघुफिल्म दाखविण्यात आली. पदवीधर संघटनेचे महारू निकम यांनी वाघ यांचा सत्कार केला. आभार सरला आहिरराव यांनी मानले.
सुलभक म्हणून नीलेश भामरे, चंद्रकांत खिरोळकर, मुरलीधर बागुल, दिनेश पवार, मोठाभाऊ पगार, अभिनंदन धात्रक यांनी संयोजन केले.