बागलाणच्या कलाशिक्षक संघटनेकडून चित्राद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 06:09 PM2020-04-12T18:09:55+5:302020-04-12T18:11:38+5:30
संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असून अनेक राज्यात बाधित रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे . यापासून ग्रामीण भागही सुरक्षित राहिलेला नाही. मालेगावसारख्या शहरात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व स्तरातील हात मदतीसाठी पुढे येत असताना बागलाण तालुक्यातील व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघटनेमार्फत सर्व कला शिक्षक एकत्र येत सटाणा शहराच्या मुख्य चौकात कोरोना व्हायरचे चित्र काढून त्यावर वेगवेगळे स्लोगन टाकून जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.
सटाणा : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असून अनेक राज्यात बाधित रूग्णांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे . यापासून ग्रामीण भागही सुरक्षित राहिलेला नाही. मालेगावसारख्या शहरात दिवसेंदिवस रूग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत सर्व स्तरातील हात मदतीसाठी पुढे येत असताना बागलाण तालुक्यातील व्हिजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघटनेमार्फत सर्व कला शिक्षक एकत्र येत सटाणा शहराच्या मुख्य चौकात कोरोना व्हायरचे चित्र काढून त्यावर वेगवेगळे स्लोगन टाकून जनजागृती करण्याचे काम करीत आहेत.
मालेगाव शहरामध्ये वाढलेली रु ग्ण संख्या आणि सटाणा शहराचे मालेगावपासून जवळचे अंतर या पार्श्वभूमीवर आता सटाणा पोलीस स्टेशन, नगरपरिषद यांच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. सटाणा शहरात आजपर्यंत एकही बाधित रु ग्ण न सापडल्याने सुरक्षित आहे. मात्र मालेगावची संख्या वाढली तर सटाणा शहराला त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे कला शिक्षक संघटना व सटाणा पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सटाणा शहरातील मुख्य चौकात कोरोना व्हायरसचे चित्र काढून व त्यावर वेगवेगळे स्लोगन टाकून नागरिकांना घरातून बाहेर निघण्यासाठी प्रतिबंध करण्यात येत आहे. या कामासाठी कलाशिक्षक संघटनेचे बागलाण तालूका अध्यक्ष धनंजय सोनवणे, कमलाकर शेवाळे, दिगंबर अहिरे, नंदकिशोर जाधव, शिवाजी भोसले, नंदकिशोर शेवाळे, नंदन मोरे, उमेश पानपाटील, प्रवीण अहिरे, राजेंद्र मोरे, नंदन मोरे, दीपक वडगे, रु पेश सोनवणे आदि कलाशिक्षकांनी स्वेच्छेने व स्वखर्चाने पुढाकार घेऊन सटाणा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदलाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे ,पोलीस नाईक पुंडलिक डंबाळे आदी उपस्थित होते.