‘एड््स’विरोधी जनजागृती रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:25 AM2019-12-10T00:25:09+5:302019-12-10T00:25:46+5:30
जागतिक एड्स सप्ताहनिमित्त महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व बिटको रुग्णालयाच्या वतीने परिसरातून जनजागृती रॅली काढली होती.
नाशिकरोड : जागतिक एड्स सप्ताहनिमित्त महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व बिटको रुग्णालयाच्या वतीने परिसरातून जनजागृती रॅली काढली होती.
१ डिसेंबर जागतिक एड्स दिन व १ ते ७ डिसेंबर एड्स सप्ताह साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण सोसायटी व बिटको रुग्णालयाच्या वतीने शनिवारी सकाळी परिसरातून एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली होती. एड्स जनजागृती रॅलीचे उद्घाटन आमदार सरोज आहिरे, नाशिकरोड प्रभाग सभापती विशाल संगमनेरे, नगरसेवक प्रशांत दिवे, डॉ. मनोज चौधरी, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे, डॉ. अजित साळुंके यांच्या हस्ते रॅलीस हिरवा ध्वज दाखवून करण्यात आले. रॅलीमध्ये देवळालीगाव अॅँग्लो उर्दू हायस्कूल, कै. बिंदू रामराव देशमुख महिला महाविद्यालय, नाशिक मेडिको नर्सिंग महाविद्यालय इंदिरानगर, के. के. वाघ नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, रुग्णालयाचे अधिकारी, आदी सहभागी झाले होते. प्रास्ताविक तानाजी इंगळे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. विशाल जाधव यांनी केले. यावेळी डॉ. आवेश पलोड, अजय जाधव, शेखर राऊत, संदीप चव्हाण, कुंदन पवार आदी उपस्थित.