स्वच्छता अभियानअंतर्गत पथनाट्याद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:14 AM2021-02-12T04:14:00+5:302021-02-12T04:14:00+5:30
या अभियानाद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विटा (ता. खानापूर) येथील नितीन गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये ...
या अभियानाद्वारे नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विटा (ता. खानापूर) येथील नितीन गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेचा प्रसार, प्रचार करण्यासाठी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत आहे. हे अभियान ९ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आले आहे. महिनाभर चालणाऱ्या या स्वच्छता अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांपैकी गटनेते कौतिक पगार यांच्या प्रमुख उपस्थितीत या पथनाट्याची सुरुवात करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ता बबनराव पगार यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या अभियानाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी आरोग्य सभापती जयेश पगार, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल, नगरसेवक बाळासाहेब जाधव, माजी सरपंच बुधा जाधव, अशोक देवघरे, राजेंद्र कायस्थ, योगेश पगार, विनोद निकम आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल म्हणाले, की या स्वच्छता अभियानात नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी हे पथनाट्य आरोग्याचा संदेश देत कळवण शहरात फिरणार आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत ओला, सुका कचरा कुठे टाकायचा व इतरत्र टाकल्यानंतर त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, उघड्यावर शौचास जाण्याचे दुष्परिणाम भावी पिढीसाठी कसे घातक आहेत हे विटा येथील नितीन गवळी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पथनाट्यातून सादर केले. कळवण शहरातून गांधी चौक, नेहरू चौक, मेन रोड, संभाजी नगर, शिवाजी नगर, गणेश नगर तसेच शाळेत सादर करून कळवणवासीयांना स्वच्छतेचा संदेश दिला.
===Photopath===
110221\11nsk_12_11022021_13.jpg
===Caption===
कळवण नगरपंचायतीच्या वतीने नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व पटण्यासाठी आयोजित पथनाट्य कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते बबन पगार, कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार, मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल, सभापती जयेश पगार व नगरसेवक बाळासाहेब जाधव आदी.