मतदार दिनानिमित्त जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:47 PM2020-01-25T22:47:58+5:302020-01-26T00:15:06+5:30
ताहाराबाद : मुल्हेर येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्र म घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य ...
ताहाराबाद : मुल्हेर येथील जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्र म घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य ए. के. मोरे होते. प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक सी. टी. आचार्य, प्राध्यापक पी. व्ही. येवला उपस्थित होते.
मतदान कसे करावे, याबाबाबत प्रत्यिक्षकातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. न चुकता मतदान केलेच पाहिजे. जनहिताचे शासन निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने जात-पात-धर्म तसेच इतर प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे मतदान करावे. मतदार जागृतीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबात व परिसरात जागृती करावी, असे आवाहन प्राचार्य ए. के. मोरे यांनी केले. यावेळी संपूर्ण गावातून घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.
ताहाराबाद विद्यालय
ताहाराबाद : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. महाविद्यालयात विभाग, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ या विभागांच्या वतीने लोकशाही, भारतीय संविधान व निवडणुका यांच्या चौकटीत विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध विषयांवर पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ.एम. एल. साळी, सचिन कोठावदे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्र म अधिकारी डॉ. गणेश लिंबोळे, प्रा. शंकर आवारी, सहायक रासेयो अधिकारी प्रा. नीलेश निकम व डॉ. सीमा नायर उपस्थित होते.