अहो आश्चर्यम...! पाच महिन्यांत शहरात अवघे पाच वाहनचालक दारु पिऊन तर्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:11 AM2021-07-02T04:11:10+5:302021-07-02T04:11:10+5:30

नाशिक : कोरोनाच्या लाटेमुळे मद्यपी वाहनचालकांना मोकळीक मिळू लागली आहे. यामुळे शहरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. तीन दिवसांपूर्वी अशाच ...

Awesome ...! In five months, only five drivers in the city have been drinking | अहो आश्चर्यम...! पाच महिन्यांत शहरात अवघे पाच वाहनचालक दारु पिऊन तर्राट

अहो आश्चर्यम...! पाच महिन्यांत शहरात अवघे पाच वाहनचालक दारु पिऊन तर्राट

Next

नाशिक : कोरोनाच्या लाटेमुळे मद्यपी वाहनचालकांना मोकळीक मिळू लागली आहे. यामुळे शहरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. तीन दिवसांपूर्वी अशाच एका मद्यपी कारचालकाच्या सुसाट वाहतुकीचा थरार डीजीपीनगरवासीयांना अनुभवयास आला. कारच्या धडकेत आजोबा अन‌् चिमुकल्या नातवाला आपले प्राण गमवावे लागले. अशा घटना दरदिवसाआड शहरात घडत आहेत. दारु पिऊन वाहनचालक तर्राट होत बेफामपणे वाहने दामटवत असल्याने रस्ता सुरक्षा धोक्यात सापडली आहे.

कोरोना संसर्गामुळे मद्यपी वाहनचालकांवरील पोलिसांची कारवाई पूर्णपणे थंडावली आहे. ब्रेथ ॲनालायझरच्या वापरावरही मर्यादा आल्या आहेत. तसेच तोंडावर मास्क असल्यामुळे एखाद्या वाहनचालकाला पोलिसांनी अडविले तरीदेखील तो खाली उतरुन गळ्यातील मास्क पटकन नाकातोंडावर ओढून घेतो. यामुळे मद्यप्राशन केले असले तरी त्याची दुर्गंधी येत नाही आणि अनेकदा पोलिसांकडूनही वाहनचालकांच्या बोलण्याच्या वाचाशक्तीकडे दुर्लक्ष केले जाते. एखाद्याची वाचा अडखळत असेल तर त्याची वैद्यकीय चाचणी करून मोटार वाहन कायद्यान्वये ड्रंक-ड्राईव्हची कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून शहरात ही कारवाई थंड बस्त्यात गुंडाळली गेली आहे. चालू वर्षी मे अखेरपर्यंत नाशिकमध्ये केवळ पाच वाहनचालकांनी मद्य प्राशन करून वाहन चालविल्याचे कारवाईवरून पुढे येते हे विशेष!

--आलेख---

वर्ष

२०१९ : जानेवारी ४३/ फेब्रुवारी २४/ मार्च १४६/ एप्रिल ३२/ मे ११५/ जून १५२/ जुलै १८६/ ऑगस्ट ११४/ सप्टेंबर १२९/ ऑक्टोबर ७५/ नोव्हेंबर ३७/ डिसेंबर ७५

२०२० : जानेवारी ८३ / फेब्रुवारी ३२/ मार्च ३२/ एप्रिल ००/ मे ००/ जून ००/ जुलै ००/ ऑगस्ट ००/ सप्टेंबर ००/ ऑक्टोबर ००/ नोव्हेंबर ००/ डिसेंबर ००

---

२०२१मध्ये मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई (३१ मे-पर्यंत)

२०२१ : जानेवारी १ / फेब्रुवारी १/ मार्च ०३/ एप्रिल ००/ मे ००/ जून ००/ जुलै ००/ ऑगस्ट ००/ सप्टेंबर ००/ ऑक्टोबर ००/ नोव्हेंबर ००/ डिसेंबर ००

----

---इन्फो--

मद्यविक्रीवर बंदी तरीही भागविली हौस

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश हाेता. यामुळे मद्यविक्री बंद राहिली. मात्र, तरीही अनेकांनी आपली हौस भागविण्यासाठी आगाऊ ‘स्टाॅक’ घरात करून ठेवलेला होता. तसेच काही दिवसांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ऑनलाईन मद्यपुरवठ्याला परवानी दिली गेली. यामुळे मद्यपींना घरपोच मद्य उपलब्ध होण्याचा मार्ग माेकळा झाला. तरीदेखील मद्यपी वाहनचालक मात्र पोलिसांना रस्त्यावर फारसे आढळून आलेले नाहीत.

----इन्फो--

पोलिसांकडे ९५ ब्रेथ ॲनालायझर

शहर पोलिसांकडे एकूण ९५ ब्रेथ ॲनालायझर उपलब्ध आहेत. यापैकी शहर वाहतूक शाखेकडे ६९, तर तेरा पोलीस ठाण्यांकडे प्रत्येकी २ याप्रमाणे २६ ब्रेथ ॲनालायझर आहेत. मात्र, कोरोनामुळे या यंत्राचा उपयोग हा वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शक्य नसल्यामुळे पोलिसांना मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करणे अवघड झाले आहे. मद्यपी वाहनचालकांविरूध्द न्यायालयात खटला दाखल झाला, तर त्यास १० हजारापर्यंत दंड होऊ शकतो.

Web Title: Awesome ...! In five months, only five drivers in the city have been drinking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.