वीज कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 04:55 PM2020-06-22T16:55:48+5:302020-06-22T16:59:17+5:30

सटाणा : शहरासह तालुक्यातील हजारो वीजग्राहकांना वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील अवास्तव वीजबिले देऊन लाखोंची लूट केली असल्याची ओरड होत असून, नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Awwa's Savva bills from the power company | वीज कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिले

वीज कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिले

Next
ठळक मुद्देप्रत्येक ग्राहकास सरसकट दोनशे ते तीनशे युनिट्सची सूट द्यावी, अशी मागणी

सटाणा : शहरासह तालुक्यातील हजारो वीजग्राहकांना वीज वितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील अवास्तव वीजबिले देऊन लाखोंची लूट केली असल्याची ओरड होत असून, नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दरमहा चारशे ते पाचशे रु पये वीजबिल भरणाऱ्या ग्राहकाला चार ते पाच हजार रु पयांपर्यंत वीजबिल देऊन सरासरीच्या नावाखाली सरसकट जाचक कर लादला आहे. संबंधित कंपनीने बिलांची दुरु स्ती करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. लॉकडाऊनच्या काळात उन्हाळा असल्याने प्रत्येक ग्राहकाने मोठ्या प्रमाणात फॅन, कुलर, टीव्ही, ट्यूब, मिक्सर यांचा वापर केला असेलही मात्र वीज वितरण कंपनीने थेट मीटर रीडिंग न घेता सरासरी वीजबिले दिली आहेत.
वीज वितरण कंपनीने सरासरीचा अर्थ लावताना जाचक अटी-शर्तींचा आधार घेत वीज ग्राहकांची लूट केली आहे. नियमित वीजबिले भरणारे सामान्य ग्राहक या प्रकाराने चक्र ावून गेले आहेत. एका युनिटमागे एक रु पया ४५ पैसे वहन आकार लावून प्रत्येक वीज ग्राहकास सरासरी आठशे ते हजार रु पयांचा भुर्दंड लादला आहे. जून २०१९ व जून २०२० या दोन महिन्यातील वीज वापराची तुलनात्मक आकडेवारी बिलावर दिली आहे. जूनमध्ये प्रत्येक ग्राहकाने गेल्या वर्षाच्या तुलनेत पाचशे ते आठशे युनिट अतिरिक्त वापर केल्याची संशयास्पद नमूद आकडेवारी देऊन दिशाभूल केली असून, कंपनीची ही जाचक कर वसुली थांबवून प्रत्येक ग्राहकास सरसकट दोनशे ते तीनशे युनिट्सची सूट द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: Awwa's Savva bills from the power company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.