सुरक्षेची ऐशीतैशी : वैद्यकीय व्यावसायिक संघटित; हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनची स्थापना मनपा रुग्णालयांसाठी सोयीचे निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:11 AM2017-12-29T01:11:20+5:302017-12-29T01:12:39+5:30

नाशिक : सुरक्षिततेच्या कारणावरून खासगी वैद्यकियांना नाना कारणांवरून वेठीस धरले जात असल्याची तक्रार असताना, महापालिकेच्या आणि अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन सुरक्षेच्या उपाययोजना मात्र करण्यात आलेल्या नाहीत.

Axis of safety: organized by a medical professional; Establishment of Hospital Owners Association Convenient Criteria for Municipal Hospitals | सुरक्षेची ऐशीतैशी : वैद्यकीय व्यावसायिक संघटित; हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनची स्थापना मनपा रुग्णालयांसाठी सोयीचे निकष

सुरक्षेची ऐशीतैशी : वैद्यकीय व्यावसायिक संघटित; हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनची स्थापना मनपा रुग्णालयांसाठी सोयीचे निकष

googlenewsNext
ठळक मुद्देउपाययोजना मात्र करण्यात आलेल्या नाहीरजिस्ट्रेशन नसेल तर त्यावरून वाद

नाशिक : सुरक्षिततेच्या कारणावरून खासगी वैद्यकियांना नाना कारणांवरून वेठीस धरले जात असल्याची तक्रार असताना, महापालिकेच्या आणि अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन सुरक्षेच्या उपाययोजना मात्र करण्यात आलेल्या नाहीत. खासगी रुग्णालयात जाणाºया रुग्णांचा जीव महत्त्वाचा; मग महापालिकेच्या रुग्णालयात जाणाºया रुग्णांच्या आयुष्याचे मोल नाही काय, असा थेट प्रश्न वैद्यकीय व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
महापालिकेकडे वारंवार जाऊनही प्रशासन पूर्वलक्षी पद्धतीने कायद्याची करीत असलेली अंमलबजावणी, हार्डशिपच्या नावाखाली लाखो रुपयांच्या दिलेल्या नोटिसा आणि अग्निसुरक्षेच्या जाचक अटींविरुद्ध शहरातील हॉस्पिटलचे संचालक एकवटले असून, त्यांनी सर्व चिकित्सा प्रणालीच्या व्यावसायिकांची संघटना स्थापन केली आहे. विधायक मार्गाने प्रयत्न झाले नाहीच तर मग वैधानिक मार्गाने जाण्याची तयारी या व्यावसायिकांनी केली आहे. पाच वर्षांपासून महापालिका शहरातील सर्व रुग्णालयांना अग्निसुरक्षा उपाययोजना करण्यासाठी सक्ती करीत असून, त्यासाठी लाखो रुपयांच्या हार्डशिप बरोबरच अग्निप्रतिबंधक उपाययोजनांसाठी देखील खर्च करावा लागत आहे. त्यामुळे अनेकदा प्रत्यक्ष अधिकाºयांना भेटून आणि लोकप्रतिनिधींमार्फत प्रश्न मांडूनही उपाय होत नसल्याने संबंधित अखेरीस मेटाकुटीस आले आहेत. कोलकाता येथे एका रुग्णालयाला आग लागल्याने नाशिकमधील सर्व रुग्णालये धोकादायक असल्याच्या आविर्भावात कार्यवाही करणारी नाशिक महापालिका आपल्या मालकीच्या आणि अन्य शासकीय रुग्णालयांबाबत अशी भूमिका का घेत नाही, असा प्रश्न निर्माण केला जात आहे. नाशिक शहरात महापालिकेचे बिटको रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, जिजामाता प्रसूतिगृह, मायको रुग्णालय, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय तसेच अन्य अनेक रुग्णालये आणि प्रसूतिगृह आहेत. परंतु तेथे पाच वर्षांत कोणत्या अग्निसुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या? जिल्हा शासकीय रुग्णालयात शहर आणि जिल्हाच नव्हे, तर उत्तर महाराष्टÑ तसेच जव्हार, मोखाडा येथूनही हजारो रुग्ण येत असतात. खासगी रुग्णालयांपेक्षा कैक पटीने अधिक रुग्ण महापालिकेच्या बिटको तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात येत असतात. मग मनपाच्या रुग्णालयात अग्निसुरक्षा का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयांना देण्यात आलेल्या सवलतीदेखील सापेक्ष असून, त्याचा लाभ मिळेलच असे नाही. दुसरीकडे नगररचना विभागाने साडेतीनशे रुग्णालयांच्या फाईली तयार केल्या असून, लाखो रुपयांच्या हार्डशिप आकारण्याच्या फाईली तयार केल्या असल्या तरी हार्डशिपची रक्कमच प्रचंड असल्याने त्या भरून नियमित करणे शक्य होत नाही. शहरातील काही मोठ्या रुग्णालयांमध्ये हृदयरोग, मूत्रपिंड, मेंदूविकार तसेच अन्य शस्त्रक्रिया होतात. अशा रुग्णालयांमध्ये येणाºया रुग्णांचे मेडिक्लेमदेखील असतात. महापालिकेकडे रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन नसेल तर त्यावरून वाद होतात. त्यामुळे अशा काही निवडक मोठ्या रुग्णालयांनीच महापालिकेकडे हार्डशिपची रक्कम भरून मंजुरी
मिळवली आहे. परंतु त्या किंवा अन्य उपाययोजना करून रजिस्ट्रेशन मिळवणाºयांची संख्या अवघी २७ असल्याचे समजते.
दीडेक हजारांपैकी २७ रुग्णालयांनी हार्डशिपची रक्कम भरणे हे प्रमाण खूपच अल्प आहे. त्यामुळे आता एकूणच त्रस्त झालेल्या आधुनिक वैद्यकशास्त्र (अ‍ॅलोपॅथी), आयुर्वेद, होमिओपॅथी अशा विविध चिकित्सा प्रणालीच्या रुग्णालयाच्या संचालकांनी एकत्र येऊन नवीन संघटना तयार केली आहे. प्रश्न सुटत नसल्यास न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू असल्याचे समजते.

Web Title: Axis of safety: organized by a medical professional; Establishment of Hospital Owners Association Convenient Criteria for Municipal Hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.