कोरोना प्रतिबंधासाठी आयुर्वेद, होमिओपॅथीचाही वापर गरजेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:13 AM2021-04-05T04:13:41+5:302021-04-05T04:13:41+5:30

नाशिक : कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे ...

Ayurveda and homeopathy should also be used for corona prevention | कोरोना प्रतिबंधासाठी आयुर्वेद, होमिओपॅथीचाही वापर गरजेचा

कोरोना प्रतिबंधासाठी आयुर्वेद, होमिओपॅथीचाही वापर गरजेचा

Next

नाशिक : कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे उपचार करणे कठीण होईल. त्यामुळे कोरोना होऊच नये यासाठी आता काळजी घेतली पाहिजे. तसेच आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीक रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या औषधांचा वापर करावा असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.

कोरोनाची स्थिती वाढत असल्याने एकंदर परिस्थतीचा विचार करून नगरसेवकांनी आपल्या प्रभागात जागृती करावी यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी सर्व नगरसेवकांना पत्र पाठविले असून या पत्रप्रपंचात महापौरांनी नगरसेवकांना आवाहन केले आहे.

नाशिक शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून गेल्या चार ते सहा महिन्यांत जेवढे रुग्ण आढळले नाहीत तितके रुग्ण केवळ मार्च महिन्यात आढळले आहेत. या आधी एका कुटुंबात एक नागरिक आढळत असे. मात्र, आता एकेका कुटुंबात चार ते पाच सदस्य बाधित आढळत आहेत. ही शहराच्या दृष्टीने आणि संबंधित नागरीकांच्या दृष्टीने खूपच गंभीर स्थिती आहे. नागरिकांनी आरोग्य नियमांचे पालन न केल्यास आणि प्रतिकारशक्ती न वाढवल्यास परिस्थती हाताबाहेर जाऊ शकते.

परिस्थिती हाताबाहेर गेल्यास रुग्णांना व्हेंटिलेटर, प्राणवायूयुक्त आणि साधारण खाट मिळणेही कठीण होऊ शकते. त्यामुळे कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच थरातील नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. नागरिकांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार आयुर्वेदिक, होमिओपॅथी औषधे घेऊन आपली प्रतिकारशक्ती वाढवावी. तसेच नियमित प्राणायाम, योगासने करावी. यासाठी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात फलकाद्वारे जनजागृती करावी, असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी नगरसेवकांना पाठवलेल्या पत्रात केले आहे.इन्फो...

नाशिक शहरातील बाधितांची संख्या कमी होऊन अगदी सहाशेवर आली होती. परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १७ हजारावर गेली आहे. ही खूप गंभीर बाब आहे. कोराेनामुळे आतापर्यंत नाशिक शहरात ११६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने आपण नामांकित डॉक्टर आणि रुग्णालयांशी चर्चा केली. त्यांनी सहकार्याची तयारी दर्शविली आहे, असे महापौरांनी म्हटले आहे.

Web Title: Ayurveda and homeopathy should also be used for corona prevention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.