कोदंडधारी रामचंद्रांना अश्वदलाची सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:43 AM2018-03-26T00:43:27+5:302018-03-26T00:43:27+5:30
एकमेव कोदंडधारी रामचंद्रांच्या भोसला महाविद्यालयाच्या परिसरातील मंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने सैनिकी शाळेच्या २४ अश्वांनी घोष पथकासमवेत आणि महावादनाच्या निनादात सलामी दिली.
नाशिक : एकमेव कोदंडधारी रामचंद्रांच्या भोसला महाविद्यालयाच्या परिसरातील मंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने सैनिकी शाळेच्या २४ अश्वांनी घोष पथकासमवेत आणि महावादनाच्या निनादात सलामी दिली. रामजन्मोत्सवाच्या निमित्ताने गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान भोसलातील शाळा-महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला. रविवारी या सर्व २४ अश्वांनी, भोसलाच्या अश्व, सशस्त्र दल यांनी रामजन्मोस्तवाच्या वेळी घोषपथकासह कोदंडधारी रामास सलामी दिली. भोसलातील आगळावेगळा श्रीरामजन्मोस्तव अनेकांनी आपल्या स्मरणात ठेवला. घोषपथक, अश्वदल, शस्त्र दल आणि महावादन करणारे शिक्षिकांचे ढोलपथक आकर्षण ठरले. प्रभू रामाच्या ठिकाणी आपली सेवा समर्पित करण्यासाठी भोसलाच्या शिशुविहार आणि बालक मंदिर शाळे तील मराठी माध्यमाच्या शिक्षिकांच्या ढोलपथकाने महावादन यानिमित्ताने सादर केले. मनाला नवचैतन्य प्रफुल्लित करणारा चैत्र शुद्ध नवमी चैत्रातील नवरात्राचा नववा दिवस या तिथीस श्रीरामाचा जन्म असलेली रामनवमी मोठ्या उत्साहात भोसलाच्या श्रीराममंदिरात साजरी करण्यात आली. यानंतर सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी आण िनाशिक जिल्हा क्र ीडा असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा स्पर्धेत बक्षिसे मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारसोहळा संस्थेचे कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, सहका र्यवाह नितीन गर्गे, कोषप्रमुख हेमंत देशपांडे, भोसला मिलिटरी स्कूलचे उपाध्यक्ष प्रशांत नाईक, श्रीराम मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र वाणी, सदस्य राजाभाऊ गुजराथी, संजय सराफ यांच्या हस्ते पार पडला. याचवेळी संस्थेच्या विविध शाळांतील रामजन्मोस्तव कार्यक्र माची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली म्हणून या शाळांतील मुख्याध्यापक शुभांगी वांगीकर, नीता पाटील, साक्षी भालेराव आणि मानसी बापट यांचा संस्थेच्या पदाधिकारी कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, सहकार्यवाह नितीन गर्गे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.