ब-२ सत्ताप्रकरणांबाबत प्रस्ताव तयार करू : दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 11:08 PM2018-08-21T23:08:26+5:302018-08-21T23:09:18+5:30
कॅम्प शहर भागासह मनमाड, नांदगाव, सटाणा तालुक्यातील मालमत्तांच्या ब-२ सत्ताप्रकरणांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.
मालेगाव : कॅम्प शहर भागासह मनमाड, नांदगाव, सटाणा तालुक्यातील मालमत्तांच्या ब-२ सत्ताप्रकरणांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नव्याने प्रस्ताव तयार करून तो शासनास सादर करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. नाशिक येथे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्या दालनात झालेली बैठक फलदायी ठरली असून, भुसे यांच्या माध्यमातून ब-२ संघर्ष समिती व मिळकतधारकांना सन २००५ पासून सुरू झालेल्या लढ्यास मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. ब-२ सत्ताप्रकारातील मालमत्तांवर मालमत्ताधारकांची नावे येथील नगर भूमापन विभागाकडून लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची अट असल्याने अनेक मालमत्ता नजराणा भरल्याशिवाय खरेदीदारांच्या नावावर होत नव्हत्या. गेल्या १२ वर्षांपासून हा तिढा सुटत नसल्याने ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच ब-२ संघर्ष समितीला थेट जिल्हाधिकाºयांपर्यंत आपले गाºहाणे मांडण्याची संधी प्राप्त झाली. मालेगाव शहर व तालुक्यातील एकूण सात हजार मालमत्ता या ब-२ सत्ता प्रकारात येतात. त्यामुळे त्या जिल्हाधिकाºयांच्या परवानगीशिवाय धारकांच्या नावावर होत नाहीत. शिवाय सरकारी नजराणा किंवा पट भरल्याशिवाय पुनर्विक्रीही होत नसल्याने गेल्या १२ वर्षांपासून हा तिढा अनुत्तरित होता. ग्रामविकास राज्यमंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस स्वत: जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन, अपर जिल्हाधिकारी रामदास खेडकर, मालेगाव उपविभागीय अधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, नगर भूमापन अधिकारी जितेंद्र भिंगारिदवे यांच्यासह महसूल विभागातील उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. ४ब-२ सत्ताप्रकारातील मालमत्तांवर मालमत्ताधारकांची नांवे नगर भुमापन विभागाकडून लावण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या परवानगीची अट असल्याने अनेक मालमत्ता नजराणा भरल्याशिवाय खरेदीदारांच्या नावावर होत नव्हत्या. जिल्हाधिकाºयांपर्यंत गाºहाणे मांडण्याची संधी प्राप्त झाली.