सप्तशृंगगडाला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
By admin | Published: April 8, 2017 12:38 AM2017-04-08T00:38:55+5:302017-04-08T00:39:26+5:30
मालेगाव : सप्तशृंगगड तीर्थक्षेत्रास विशेष बाब म्हणून ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मंजूर झाल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी कळविले आहे.
मालेगाव : सप्तशृंगगड तीर्थक्षेत्रास विशेष बाब म्हणून ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मंजूर झाल्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी कळविले आहे.
श्री सप्तशृंगगड तीर्थक्षेत्रास २००१ पासून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा होता. त्यामुळे मंदिर परिसरातील विकासकामांसाठी अतिशय कमी निधी मिळत होता. गडावर येणाऱ्या भाविकांसाठी मूलभूत सुविधांची कमतरता असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. यासाठी भुसे यांनी सप्तशृंगीदेवी मंदिरास ‘ब’वर्ग दर्जा वाढीसाठीचा प्रस्ताव ग्रामविकासकडे सादर करण्याचे आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले होते. आता ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाल्याने भक्तनिवास, पाणीपुरवठा, शौचालय, सभामंडप, वाहनतळ, व्यापारी संकुल, मंदिर परिसरातील रस्त्यांना पेव्हिंग ब्लॉक बसविणे व वाचनालय यासारखी मूलभूत विकासकामे करता येतील, असे पत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)