ब. ना. सारडा विद्यालयाचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 05:40 PM2019-06-30T17:40:49+5:302019-06-30T17:41:03+5:30
सिन्नर : फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र शासनाचे वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सुबोध रवींद्र बैरागी या विद्यार्थ्याने सिन्नर तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात सातवा क्रमांक मिळविला आहे.

आशुतोष कांतीलाल राठोड जिल्ह्यात ६० वा तर संस्कार परशुराम उगले या विद्यार्थ्याने ही शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. तर आठवी च्या परीक्षेत अभिजीत कांतीलाल राठोड हा विद्यार्थी जिल्ह्यात आठवा आला असून यश योगेश बिन्नर व तेजस जयवंत गडाख या विद्यार्थ्यांनीही शिष्यवृत्ती मिळवून यश प्राप्त केले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अण्णा जाधव, संजय वाघ, आशुतोष अंदोरे, स्मिता पाटोळे आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष बापूसाहेब पंडित, प्राचार्य दिलीप वाणी, पर्यवेक्षक सुनील हांडे आदींसह सर्व शिक्षकांनी कौतुक केले.