बाल, संस्कृत नाटकांची पर्वणी

By admin | Published: November 22, 2015 12:08 AM2015-11-22T00:08:39+5:302015-11-22T00:09:08+5:30

सांस्कृतिक संचालनालय : डिसेंबरमध्ये शहरात रंगणार दोन्ही स्पर्धा

Baal, the beauty of Sanskrit drama | बाल, संस्कृत नाटकांची पर्वणी

बाल, संस्कृत नाटकांची पर्वणी

Next

नाशिक : शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने डिसेंबरमध्ये शहरात बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक, तर संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. यानिमित्त बच्चेकंपनीसह नाट्यरसिकांना पर्वणी लाभणार आहे. दोन्ही स्पर्धा परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार आहेत.
तेरावी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा ७ ते १२ डिसेंबर दरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. त्यात दि. ७ : चिंगी (वनिता, जळगाव), सीआयडी - एका खुनाचा शोध (उत्कर्ष, भुसावळ), सुटका (द प्रोग्रेसिव्ह सोसायटी, नाशिकरोड), रानमेवा पक्ष्यांना ठेवा (प्रबोधिनी, नाशिक), जॅकी आणि तो (शानभाग विद्यालय, जळगाव), नवे गोकुळ (स्वामीनारायण स्कूल, नाशिक), दि. ८ : चमचम चमको (सप्तरंग, अहमदनगर), फुलपाखराची गोष्ट (संत ज्ञानेश्वर मंडळ, भुसावळ), ए. बी. टू. (सन्मित्र, नाशिक), पंखांतील आभाळ (रुंग्टा विद्यालय, नाशिक), शहाणपण देगा देवा (प्रबोधिनी, नाशिक), जय गणेश साम्राज्य (भारदे हायस्कूल, नगर), उडाणटप्पू (मुंदडे विद्यालय, जळगाव).
दि. ९ : होळी (ओम गुरुदेव गुरुकुल, कोकमठाण), सूर्याची लेकरे (नूतन शाळा, इगतपुरी), शाळा तुझी वाट पाहते (नटेश्वर, राहुरी), दुष्काळ (मानवता मंडळ, जळगाव), गणपती बाप्पा मोरया (मंगलमूर्ती, जळगाव).
दि. १० : बुळबुळे (महिला दूध उत्पादन संस्था, जामनेर), भूत, भविष्य, भुतावळ (गांधी हायस्कूल, इगतपुरी), हे तुम्हीही करू शकता (प्रताप विद्यालय, जळगाव), थेंबांचे टपाल (लोकमान्य मंडळ, जामखेड), अंधारफुले (लोकहितवादी, नाशिक), सपान (कृपा, नाशिक), दि. ११ : थेंबांचे टपाल (कल्पित मंच, जामखेड), बालपण (कलारंग, जळगाव), मु. पो. कळमसरा (पाटील विद्यालय, जळगाव), आई (जनस्थान, नाशिक), इस्कोट (रूपचंद विद्यालय, जळगाव), पुन्हा नको रे बाबा (दीपक मंडळ, नाशिक).
दि. १२ : केल्याने होत आहे रे.. (धनलक्ष्मी शाळा, नाशिक), ताटी उघडा (भोसला, नाशिक), मुलं देवाघरची फुलं (अनुभूती स्कूल, जळगाव), झाडवाली झुंबी (हौशी नाट्यसंघ, नगर), एक होता वाघ (अभिरंग, कल्याण) ही नाटके होतील. (प्रतिनिधी)

Web Title: Baal, the beauty of Sanskrit drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.