बाबादेव महाराज यात्रोत्सवानिमित्त वाकेत कुस्त्यांची दंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:10 AM2018-04-23T00:10:34+5:302018-04-23T00:10:34+5:30
येथील ग्रामदैवत श्री संत बाबादेव महाराज यांचा तीन दिवसीय यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. ग्रामस्थ व यात्रा समितीच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वाके : येथील ग्रामदैवत श्री संत बाबादेव महाराज यांचा तीन दिवसीय यात्रोत्सव उत्साहात साजरा झाला. ग्रामस्थ व यात्रा समितीच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी सर्व ग्रामस्थ एकत्र येतात व पुढील वर्षाच्या सार्वजनिक लिलावाची बोली बोलतात. सायंकाळी बाबादेव महाराज यांच्या शेरणी प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुसऱ्या दिवशीगावातील सर्व सुवासिनींनी बाबांच्या समाधीचे दीपआरतीने ओवाळून औक्षण केले. यात्रोत्सवानिमित्त अनेक सासुरवाशिनी एकत्र येतात. दुसºया दिवशी नवस फेडण्याचा कार्यक्रम झाला. करमणुकीसाठी सायंकाळी लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. यंदा खान्देशसम्राट सोमनाथ नगरदेवळीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात्रेच्या अखेरच्या दिवशी गावातील तुळजाभवानी आखाडा मैदानावर कुस्त्यांची दंगल रंगली. पुरातन काळापासून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या येथील आखाड्यास विशेष महत्त्व आहे. येथील कुस्तक्ष दंगलीत जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील नामवंत कुस्तीगिरांनी हजेरी लावली व बक्षिसांची लयलूट केली. यानंतर सर्व विजयी मल्लांची गावतून विजयी मिरवणूक काढण्यात आली. परगावाहून येणाºया यात्रेकरूंसाठी यात्रा समितीकडून विशेष व्यवस्था करण्यात आली होती अशी माहिती सरपंच प्रकाश बच्छाव यांनी दिली. यात्रोत्सवात कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपसरपंच विमल बागुल, माजी सरपंच रमेश बच्छाव, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर बच्छाव, शांताराम देवरे, मुकुंद निकम, देवचंद काकळीज, आनंद बच्छाव, निशांत बच्छाव, नाना बच्छाव, बाळासाहेब सावंत, सोसायटी सभापती अर्जुन बच्छाव, नारायण पाटील, साहेबराव बच्छाव, वाल्मीक नारळे, समाधान बच्छाव, पोलीसपाटील गोविंद सावंत, शिवाजी कानडे, जनार्दन बच्छाव आदी गर्दीवर लक्ष ठेऊन होते.