बाबा शेख खुनातील संशयिताचे घर पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 12:33 AM2020-10-23T00:33:15+5:302020-10-23T00:33:42+5:30
सिन्नरफाटा येथील कुविख्यात गुन्हेगार बाबा शेखची महिनाभरापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खुनातील संशयिताना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या समीर ऊर्फ मुर्गीराजा याचे अरिंगळे मळ्यातील घर अज्ञात व्यक्तींनी काहीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नाशिकरोड : सिन्नरफाटा येथील कुविख्यात गुन्हेगार बाबा शेखची महिनाभरापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खुनातील संशयिताना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या समीर ऊर्फ मुर्गीराजा याचे अरिंगळे मळ्यातील घर अज्ञात व्यक्तींनी काहीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सराईत गुन्हेगार नवाज ऊर्फ बाबा शेख याची डीजीपीनगर येथील साई मंदिराजवळ गोळी झाडून खून करण्यात आला होता. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी पाच संशयिताना अटक केली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील सिन्नर फाटा, अरिंंगळे मळा येथे राहणारा संशयित आरोपी समीर सलीम खान ऊर्फ मुर्गी राजा याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर त्याचे सर्व नातेवाईक घराला कुलूप लावून इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. याचाच फायदा घेत कोणीतरी अज्ञात गुन्हेगारांनी गुरुवारी पहाटे ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घरात आग लावली.