बाबा शेख खुनातील संशयित मुर्गीराजा याचे घर पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 07:19 PM2020-10-22T19:19:48+5:302020-10-22T19:19:59+5:30

नाशिकरोड : सिन्नरफाटा येथी कुविख्यात गुन्हेगार बाबा शेखची महिनाभरापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खुनातील संशयितांना पोलिसांनी ...

Baba Sheikh set fire to the house of Murgiraja, a suspect in the murder | बाबा शेख खुनातील संशयित मुर्गीराजा याचे घर पेटविले

बाबा शेख खुनातील संशयित मुर्गीराजा याचे घर पेटविले

googlenewsNext
ठळक मुद्देक्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने आजुबाजुचे रहिवाशी जागे झाले

नाशिकरोड : सिन्नरफाटा येथी कुविख्यात गुन्हेगार बाबा शेखची महिनाभरापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खुनातील संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हत्याप्रकरणातील मुख्य सुत्रधार असलेल्या समीर उर्फ मुर्गीराजा याचे अरिंगळे मळ्यातील घर अज्ञात व्यक्तींनी काहीतरी ज्वलनशील पदार्थ ओतून पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सराईत गुन्हेगार नवाज ऊर्फ बाबा शेख याची डीजीपीनगर-१ येथील साईमंदिराजवळ गोळी झाडून करण्यात आला होती. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. खुनाच्या गुन्ह्यातील सिन्नरफाटा अरिंंगळे मळा येथे राहणारा संशयित आरोपी समीर सलीम खान उर्फ मुर्गी राजा याला पोलिसांनी बेड्या ठोल्यानंतर त्याचे सर्व नातेवाईक घराला कुलूप लावून इतर ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. याचाच फायदा घेत कोणीतरी अज्ञात गुन्हेगारांनी गुरुवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मुर्गी राजाच्या घराचा दरवाजा तोडून कपाट, फ्रिज, दरवाजे आदी वस्तूवर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून घरात आग लावली.

दरम्यान, क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने आजुबाजुचे रहिवाशी जागे झाले. तोपर्यंत संपुर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले होते. याबाबत तत्काळ नाशिकरोड अग्निशमन दलाला माहिती कळविण्यात आली. जवानांनी घटनास्थळी धाव घेत घराला लागलेली आग विझविली. दरम्यान या दुर्घटनेत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आसमा आमिर खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Baba Sheikh set fire to the house of Murgiraja, a suspect in the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.