कॉपी करू दिली नाही म्हणून पर्यवेक्षकाला मारहाण बाभूळगाव : येवल्यात ८ जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 01:41 AM2018-03-02T01:41:41+5:302018-03-02T01:41:41+5:30
येवला : बाभूळगाव कॉलेजमध्ये परीक्षेतकॉपी करू न दिल्याने विद्यार्थिनीच्या नातेवाइकासह त्यांच्या मित्रानी पर्यवेक्षकालाच मारहाण केल्याची घटना घडली.
येवला : बाभूळगाव येथील संतोष श्रमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज केंद्र क्र मांक २११ मध्ये १२ वी परीक्षेत विद्यार्थिनीला कॉपी करू न दिल्याने विद्यार्थिनीच्या नातेवाइकासह त्यांच्या मित्रानी पर्यवेक्षकालाच मारहाण करून परिसरात तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी केंद्रसंचालकाने पोलिसात तक्रार केली आहे. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
केंद्रसंचालक प्राचार्य गोरक्षनाथ येवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवार २८ फेब्रुवारी रोजी रसायन शास्त्र व वाणीज्य संघटन विषयाचे पेपर होते. त्यामुळे विद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थिनीची महिला व पुरुष शिक्षकांमार्फत कॉफीबाबत तपासणी करून विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडण्यात येत होते. दरम्यान ब्लॉक क्रमांक ३२ मधील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी पूजा सुरेश त्रिभुवन हिची शिक्षिका माधुरी कराटे व रु पाली सोनवणे यांनी तपासणी केली असता तिच्याजवळ कॉप्या आढळून आल्याने त्या जमा करून घेण्यात आल्या. बुधवारी दुपारी ३ वाजता कला शाखेचा इतिहासचा पेपर सुरू झाला. त्यामुळे परीक्षा हॉलमध्ये तपासणी करत असताना गेटवर भांडणाचा व गर्दीचा आवाज आल्याने गेटवर पाहण्यासाठी गेले असता तेथे विद्यार्थिनी पूजा त्रिभुवन व तिच्या सोबत शुभम गुंजाळ, संतोष त्रिभुवन, राजेंद्र काकीपुरे, मयूर थळकर, प्रसाद शिंदे, संजय कापसे, रोहित परदेशी, अल्केश गायकवाड यांनी शिक्षक कैलास मन्साराम गायकवाड ब त्याच्या सोबत असलेल्या शिक्षकांना शिवीगाळ करून विद्यार्थिनीला पेपर अवघड गेल्याचे सांगत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.