बिबट्याच्या हल्ल्यातून बालक बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 01:57 AM2019-11-11T01:57:42+5:302019-11-11T01:58:42+5:30
वणी/पांडाणे : दिंडोरी तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढत असताना रविवारी सायंकाळी परमोरी येथील हल्ल्यात एक सहा वर्षीय बालक गंभीर जखमी ...
वणी/पांडाणे : दिंडोरी तालुक्यात बिबट्याचे हल्ले वाढत असताना रविवारी सायंकाळी परमोरी येथील हल्ल्यात एक सहा वर्षीय बालक गंभीर जखमी झाले आहे.
परमोरी येथील राजेंद्र आनंदा काळोगे यांच्या घराजवळ शुभम राजेंद्र काळोगे खेळत असताना उसाच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली.
बिबट्याने झडप घालताच शुभमने सुटकेसाठी आरडाओरड केली. यावेळी जवळच असलेले नागरिक धावून आले असता बिबट्या पळून गेला. या हल्ल्यामध्ये शुभम याच्या मानेला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला त्वरित दिंडोरी येथील ग्रामीण रु ग्णालयात व तेथून नाशिकला पाठविण्यात आल्याचे वनविभागाच्या श्रीमती झिरवाळ यांनी सांगितले.
परमोरी येथे उसाचे शेत व एका बाजूला ओढा असल्यामुळे या भागात बिबटे मोठ्या प्रमाणावर आढळून येत असतात, परंतु येथे पिंजरा लावण्यासाठी वारंवार मागणी करूनही येथे पिंजरे लावले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.