दुचाकी अपघातात दैव बलवत्तर म्हणून बाळ बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 08:53 PM2020-09-05T20:53:33+5:302020-09-06T00:53:23+5:30

देवळा : देवळा - कळवण रोडवर भऊर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, यामध्ये त्यांची ...

The baby was rescued as a fortune teller in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात दैव बलवत्तर म्हणून बाळ बचावले

दुचाकी अपघातात दैव बलवत्तर म्हणून बाळ बचावले

Next
ठळक मुद्देआई गंभीर जखमी। वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू,भऊर फाट्याजवळील घटना

देवळा : देवळा - कळवण रोडवर भऊर फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, यामध्ये त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली तर दैवबलवत्तर म्हणून तीन महिन्याचे बाळ बचावले आहे.
याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (दि. ३) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास देवळा-कळवण रोडवरील भऊर फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. यात दुचाकीस्वार हंजराज राजेंद्र पाटील (२२), सुरेखा हंजराज पाटील (२०, ह.मु.रा. रामनगर, ता. कळवण) मूळ गाव शहादा हे दांपत्य गंभीर जखमी झाले. त्यांच्या सोबत असलेले तीन महिन्यांचे बालक बाजूला फेकले गेल्याने बचावले. जखमींना उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून मालेगाव येथे खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान हंसराज राजेंद्र पाटील यांचा मृत्यू झाला आहे. त्यांची पत्नी सुरेखा पाटील हिच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या भीषण अपघातात तीन महिन्याचे बालक सुखरूप आहे. घटनास्थळाजवळ राहणाऱ्या महिलांनी बाळाला दूध पाजून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: The baby was rescued as a fortune teller in a two-wheeler accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.