बालकाची भरदिवसा कोयत्याने निर्घृण हत्या

By admin | Published: July 14, 2017 01:05 AM2017-07-14T01:05:30+5:302017-07-14T01:05:44+5:30

पंचवटी : जावयाने सासूसह मेव्हणीच्या आठ वर्षीय बालकाची हत्या केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली.

The baby's death annoyantly murdered | बालकाची भरदिवसा कोयत्याने निर्घृण हत्या

बालकाची भरदिवसा कोयत्याने निर्घृण हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पंचवटी : मखमलाबाद शिवारातील मूळच्या गंधारवाडी वस्तीमध्ये राहणाऱ्या खराटे कु टुंबाच्या जावयाने सासूसह मेव्हणीच्या आठ वर्षीय बालकाची भरदिवसा कोयत्याने निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि.१३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंदाबाई दशरथ खराटे व दशरथ सोनू खराटे हे दाम्पत्य सध्या पाथर्डी फाटा येथे वास्तव्यास आहे. खराटे यांच्या एका मुलीचा विवाह रामवाडी येथील तळेनगर परिसरात राहणाऱ्या मोतीराम धोंडीराम बदादे याच्याशी झाला असून, बदादे हा सीबीएस परिसरात हातगाडीवर स्टेशनरी विक्र ीचा व्यवसाय करतो. संशयित जावई बदादे याने काही दिवसांपासून सासरे खराटे यांच्याकडे एक ते दीड लाख रु पयांच्या मागणीचा तगादा लावला होता. वारंवार मागणी करूनही पैसे देत नसल्याचा राग मनात धरून गुरु वारी संशयित मोतीराम याने सासू मंदाबाई खराटे (५५) व मेव्हणीचा ८ वर्षाचा मुलगा नैतिक लिलके या दोघांना काहीतरी खोटे सांगून पाथर्डी फाटा येथून दुचाकीवर बसवून रामवाडी जवळील गोदाकाठलगतच्या बाभळीच्या जंगलात नेऊन धारदार शस्त्राने मंदाबाई व नैतिकवर क्रूरपणे हल्ला चढवित ठार केले. डोक्यावर व मानेवर गंभीर खोलवर वार लागल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. संशयिताने दोघांचे मृतदेह सुमारे शंभर मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. पोलिसांना हल्ल्याच्या ठिकाणापासून दूर अंतरावर मृतदेह आढळून आले. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून, त्याचा सर्वत्र शोध घेतला जात आहे. सर्व पोलीस ठाण्यांना संशयिताचे छायाचित्र पाठविण्यात आले असून, ग्रामीण पोलिसांसह रेल्वे, बसस्थानकांवरही पोलिसांना सतर्क करण्यात आल्याचे उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: The baby's death annoyantly murdered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.