प्रसूतिदरम्यान बाळाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:03 AM2018-09-12T01:03:23+5:302018-09-12T01:03:29+5:30
प्रसूतीसाठी दाखल महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, चांदवड शिवसेनेने आक्रमक होत दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
चांदवड : प्रसूतीसाठी दाखल महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, चांदवड शिवसेनेने आक्रमक होत दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील कानमंडाळे येथील निर्मला सचिन पवार (२६) यांना दि. ९ सप्टेंबर रोजी रात्री प्रसूती वेदना होऊ लागल्याने १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या.
येथील कर्मचाऱ्यांनी डॉ. अभिजित नाईक यांना महिला प्रसूतीसाठी दाखल झाली असल्याची माहिती दिली. मात्र, सदर डॉक्टर लगेचच रु ग्णालयात हजर झाले नाहीत. दुसरीकडे महिलेला तीव्र प्रसूती वेदना होत होत्या. शेवटी दाखल केलेल्या बेडवरच महिला प्रसूत झाली. मुलगी जन्माला आली; मात्र थोड्याच वेळात रुग्णालयाकडून तिला मृत घोषित केले.
याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे, शहरप्रमुख संदीप उगले, शिवसेना महिला संघटक भारती जाधव, दीपक शिरसाठ, मुकेश कोतवाल, विनायक हांडगे, अंबादास जाधव, दीपक भोईटे, गोरख हिरे, नितीन गांगुर्डे, पहिलवान
सलमान खान, रामदास ठाकरे, विनायक सवणंदरे यांनी वरिष्ठ अधिकाºयांना धारेवर धरत कडक कारवाईची मागणी केली असता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. जगदाळे यांनी लगेचच चौकशी पथक चांदवडला रवाना केले. डॉ. आनंद पवार यांना प्राथमिक चौकशीत आरोपात तथ्य आढळून आल्याने त्यांनी डॉ. अभिजित नाईक यांना चांदवड रुग्णालयातून कार्यमुक्त करत जिल्हा मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले, तर वैद्यकीय अधीक्षक डॉॅ. डी.पी. राजपूत यांचादेखील पदभार काढून घेत डॉ. सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे अधीक्षक पदाचा कारभार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
डॉ.नाईक यांच्यावर कारवाई
डॉ. नाईक यांच्यावर बाळाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला असून, यासोबतच त्यांनी कर्तव्यावर असताना मद्यप्राशन केल्याची तक्र ार आहे. या दोन्ही गोष्टींची खातेअंतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. येथील रु ग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असल्याने कायमच अपघातातील जखमी येथे दाखल होतात; परंतु येथील १२ पैकी ५ डॉक्टर प्रतिनियुक्तीवर असल्याने रुग्णांना नाशिक रु ग्णालयात पाठविण्यात येते, हा मुद्दा तालुकाप्रमुख शांताराम ठाकरे यांनी उपस्थित करताच प्रतिनियुक्तीवर असलेले सर्व पाचही डॉक्टर उद्यापासून नियमित काम करणार असल्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांनी दिली.