‘त्या’ अर्भकाची पुन्हा होणार डीएनए चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 12:02 AM2019-02-15T00:02:41+5:302019-02-15T00:24:00+5:30
मालेगाव तालुक्यातील कौळाणे शिवारात घडलेल्या अवैध गर्भपात प्रकरणातील अर्भकाची पुन्हा डीएनए चाचणी केली जाणार आहे.
मालेगाव : तालुक्यातील कौळाणे शिवारात घडलेल्या अवैध गर्भपात प्रकरणातील अर्भकाची पुन्हा डीएनए चाचणी केली जाणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने पुरलेले अर्भक आज गुरुवारी तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत बाहेर काढून डीएनए चाचणीसाठी नमुने घेतले आहेत. गेल्या २१ जानेवारी रोजी तालुक्यातील कौळाणे शिवारात अवैध गर्भपाताचा प्रकार घडला होता. पुरलेले अर्भक पोलिसांनी व वैद्यकीय अधिकाºयांनी ताब्यात घेतले होते. २२ जानेवारी रोजी अर्भकाचे नमुने नाशिक येथील रासायनिक प्रयोग शाळेत डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले होते; मात्र प्रयोग शाळेच्या वैद्यकीय अधिकाºयांनी नमुने व्यवस्थित नसल्यामुळे चाचणी करता येत नसल्याचे किल्ला पोलिसांना कळविले होते. किल्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे व तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिपक ठोके यांनी पुन्हा डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला.