निकवेल परिसरात बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 01:14 PM2019-09-09T13:14:58+5:302019-09-09T13:15:30+5:30
निकवेल :- बागलाण तालुक्यातील निकवेल येथे आठ ते दहा दिवसापासुन बिबट्याने धुमाकूळ घातला असून पाळीव जनावरांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
निकवेल :- बागलाण तालुक्यातील निकवेल येथे आठ ते दहा दिवसापासुन बिबट्याने धुमाकूळ घातला असून पाळीव जनावरांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
गणेश किशन वाघ यांच्या शेतावरील खळयात बांधलेल्या शेळीला बिबटयाने रविवारी रात्री हल्ला करत फस्त केले. तसेच आठ ते दहा दिवसातुन ही चौथी घटना आहे.परिसरात रोज बिबटया येत असुन त्याने आठ दिवसापुर्वी मार्तन्ड सोनवणे यांचा घोडा, दत्तू वाघ व भिला वाघ यांच्याही शेळया फस्त केल्या आहेत. दिवसेदिवस पाळीव जनावरांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. निकवेल परिसरातील जोरण, दहिदुले, विंचुरे, किकवारी परिसरात बाजरी, मका निंदणीचे ,नांगरणीचे कामे सुरु असुन बिबट्या परिसरात आढळुन येत असल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत.बिबटया गाव परिसरात व शिवारात आढळुन येत असल्याने कुणीही मजुर, सालगडी शेतात कामावर येण्यास घाबरत असुन कामे खोळबंली आहेत.तसेच या महिन्यात १ तारखेपासुन विज वितरण कंपनीने वीजेच्या वेळांमध्ये बदल केला असुन आठवड्यात चार दिवस दिवसा व तीन दिवस रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यतच वीज राहते. त्यामुळे बिबट्याच्या संचारामुळे शेतकरी बांधव रात्री शेतात पाणी भरण्यास घाबरत आहेत. वनविभागाने निकवेल येथे पिंजरा लावण्याची मागणी निकवेल वन कमिटीचे अध्यक्ष विवेक सोनवणे, उपसरपंच मुरलीधर वाघ, सोसायटीचे माजी अध्यक्ष निलेश वाघ, पोलिस पाटील विशाल वाघ,भिला वाघ,निलेश खरे,रामराव अनारे,रमेश वाघ,राजेन्द्र महाजन,सुनिल वाघ ,निलेश अनारे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.