कामगार संघटनेच्या सभेत बाचाबाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:20 AM2018-02-27T00:20:15+5:302018-02-27T00:20:15+5:30

येथील एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळ व बाचाबाचीने गाजली. कम्युनिटी हॉल येथे झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर गोरे होते.

 Bachabachi in the meeting of the trade unions | कामगार संघटनेच्या सभेत बाचाबाची

कामगार संघटनेच्या सभेत बाचाबाची

Next

ओझर टाउनशिप : येथील एचएएल कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळ व बाचाबाचीने गाजली. कम्युनिटी हॉल येथे झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर गोरे होते.  व्यासपीठावर कार्याध्यक्ष प्रवीण तिदमे, सरचिटणीस संजय कुटे, उपाध्यक्ष सचिन माळोदे, आनंद गांगुर्डे, अविनाश भंडारे, यजुवेन्द्र बरके, दुर्गेश मिश्रा, दीपक कदम, सहचिटणीस भावेश विसपुते, श्रीकांत पगार, प्रवीण गाडे, अनिल मंडलिक, मनोज भामरे, गिरीष वलवे, खजिनदार अविनाश कुलकर्णी, संघटक सचिव बाळासाहेब थोरात उपस्थित होते.  दुपारी साडेतीन वाजता सभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर कोरमअभावी अध्यक्ष गोरे यांनी सभा अर्धा तासासाठी तहकूब केली. सभासदांच्या परवानगीने पंधरा मिनिटांनी पुन्हा सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते कामगार चळवळीचे जनक कै. नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर शहीद जवान, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील दिवंगत झालेल्या मान्यवरांना व सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.  सरचिटणीस संजय कुटे यांनी विषयपत्रिकेवरील विषयाचे वाचन सुरू केले. अध्यक्ष गोरे व सरचिटणीस कुटे यांनी ऐनवेळी येणाºया विषयांवर चर्चा करण्यासाठी सर्वांना बोलण्याची संधी देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर सभा पूर्ववत सुरू झाली. सरचिटणीस संजय कुटे यांनी मांडलेला अहवाल व इतिवृत्ताला आवाजी मतदानाने मंजुरी देण्यात आली. खजिनदार अविनाश कुलकर्णी यांनी मांडलेल्या जमा-खर्च पत्रकासह ताळेबंदास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर बॅँकेचे माजी अध्यक्ष बी. व्ही. शेळके, सोमनाथ निकम, जितू जाधव, मंदिर लोखंडे, योगेश्वर आहिरे, सचिन ढोमसे, विकास खडताळे आदी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संजय कुटे यांनी उत्तरे दिली. तसेच सभासदांनी केलेल्या सूचनांचे स्वागत केले. सभा तब्बल तीन तास चालली. सभेसाठी सभासद उपस्थित होते. सचिन ढोमसे यांनी आभार मानले.
सभासदांचा व्यासपीठावर गोंधळ
मागील सभेच्या इतिवृत्तास सभासदांनी मंजुरी दिली. दुसºया विषयाचे वाचन सुरू असताना विरोधी गटाच्या काही सभासदांनी व्यासपीठावर येऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे सत्ताधारी व विरोधी गटाच्या सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. घोषणाबाजी सुरू झाली. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटाच्या सभासदांना शांत केले.

Web Title:  Bachabachi in the meeting of the trade unions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक